Shocking: नामांकित शाळेसमोर सुरू होता वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ५ तरुणी अन् २ पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलं

Police Bust Alleged Prostitution Racket: मिरा- भाईंदरमध्ये सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली तर ५ तरुणींची सुटका केली.
Shocking: नामांकित शाळेसमोर सुरू होता वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ५ तरुणी अन् २ पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलंन
Police Bust Alleged Prostitution RacketPolice Bust Alleged Prostitution RacketSaam T
Published On
  • मिरा रोडमधील लक्झरी स्पावर पोलिसांनी छापा टाकला.

  • वेश्या व्यवसाय प्रकरणी ५ महिलांची सुटका करण्यात आली

  • दोन आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला

  • स्पा सेंटरचे परवाने आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू

मनोज तांबे, भाईंदर

मिरा रोडमधील एका लक्झरी स्पावर पोलिसांची मोठी कारवाई केली. या स्पाच्या आडून वेश्या व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी दुपारच्या सुमारास अचानक धाड टाकत या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याठिकाणावरून पोलिसांनी ५ तरुणी आणि दोन तरुणांना नको त्या अवस्थेत पकडलं. पोलिसांनी या ५ तरुणींची सुटका करत दोन तरुणांना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे मिरा रोडमधील नामांकित शाळेसमोर हे स्पा सेंटर असून त्याठिकाणी हे गंदाकाम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा रोड येथील बेव्हर्ली पार्कमधील ए.एन.के. लक्झरी सलून अँड स्पावर पोलिसांनी छापा टाकून कथित सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान स्पामधून ५ तरुणींची सुटका करण्यात आली असून स्पाच्या आड सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारासही कारवाई करणम्यात आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Shocking: नामांकित शाळेसमोर सुरू होता वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ५ तरुणी अन् २ पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलंन
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

मिरा रोड पोलिसांनी आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून स्पाचे परवाने, कागदपत्रे आणि इतर कायदेशीर दस्तऐवजांचीही तपासणी सुरू केली आहे. हा बेकायदेशीर व्यवसाय नेमका किती दिवसांपासून सुरू होता आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, पुढील चौकशीत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Shocking: नामांकित शाळेसमोर सुरू होता वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ५ तरुणी अन् २ पुरूषांना नको त्या अवस्थेत पकडलंन
Crime : कोल्हापूर हादरले! माजी महिला सरपंचाचा खून, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियकराला बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com