पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावलं; विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्ज ठेवण्याची धमकी

Police Threatened to Plant Drugs: दिल्लीतल्या लाठीचार्जविरोधात पुकारलेल्या मुंबईतल्या आंदोलनात धक्कादायक घटना समोर आलीय. पोलिसांनी तरुणांना थेट ड्रग्जची पावडर खिशात ठेवून जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिलीय. याचा व्हिडिओच समोर आलाय. नेमकं काय घडलंय ? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Mumbai students allege police threats during protest
Mumbai students allege police threats during protest
Published On

ऐकलतं, मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेल्या या धमकीमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जातोय..."पुन्हा इथे दिसलात तर खिशात ५०-५० ग्रॅम पावडर टाकेन, आयुष्य वाया जाईल आणि जामीनही मिळणार नाही," अशी थेट धमकी एका पोलिसानं विद्यार्थी आंदोलकांना दिली. आणि या व्हिडिओवर एकच टीकेची झोड उठली... त्यामुळे राज ठाकरेंनी पोलीस ड्रग्ज सप्लायर आहेत का? असा संतप्त सवाल मुंबई पोलिसांना केलाय. तर प्रकाश आंबेडकरांनीही संताप व्यक्त केलाय.

Mumbai students allege police threats during protest
पंतप्रधान मोदींचा मध्यरात्री विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश; मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

दरम्यान मुंबईत शांततापूर्ण मार्गानं निदर्शनं करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांकडून छळाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केलाय... विद्यार्थ्यांना तब्बल 7 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवणं, पहाटेच्या वेळी नोटीस पाठवणं आणि लाईव्ह लोकशन पाठवायला लावणं अशा अनेक मार्गांनी पोलीस आंदोलक विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण करत असल्याचाही आरोप होतोय.

Mumbai students allege police threats during protest
CJP Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाहीच; CJP आंदोलनावर ठाम

दरम्यान मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गृहविभागानं चांगलाच दणका दिलाय..सायन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची भाषा करणाऱ्या या पोलिसावर गृह विभागानं निलंबनाची कारवाई केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

नीट पेपरफुटीचा आणि दिल्लीतल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी देशभरात तरूणांनी स्वयंस्फूर्तीनं आंदोलनं सुरू केली आहेत. तसंच आंदोलन मुंबईतही करण्यात आलं. त्यामुळे शांततेत आपला भावना व्यक्त करण्यासाठी तरूण आंदोलन करत असतील तर त्यांच्यावर एवढा दबाव टाकण्याची गरज का? मुंबईत राजकीय पंक्ष आणि संघटना शेकडो आंदोलनं करतात. त्यांनाही पोलीस असंच धमकावतात का? त्यांच्यावरही अशीच पाळत ठेवतात का? त्यामुळे या विद्यार्थ्यांना नीट वागणूक देऊन त्यांच्यात पोलिसांविषयी विश्वासाचं वातावरण तयार करण्याची गरज आहे. कारण ही दिल्ली नाही मुंबई आहे. आणि प्रश्न मुंबई पोलिसांची प्रतिष्ठेचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com