Mira Road: मिरा रोड येथील इमारतीचे छत कोसळल्याने पाच जण जखमी, पालिकेकडून स्ट्रक्चरल ऑडिट सुरू

Mira Road Building Roof Collapsed : याप्रकरणी महापालिकेने संपूर्ण इमारत रिकामी करुन स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू केले आहे.
Mira Road Building Roof Collapsed
Mira Road Building Roof Collapsed चेतन इंगळे

मीरा-भाईंदर: मुंबईलगत असलेल्या मीरारोड (Mira Road) येथील सिल्व्हर पार्क परिसरातील एका इमारतीचे छत अचानक कोसळले आहे. चंद्रेश अ‍ॅकॉर्ड कॉम्प्लेक्समधील जय-विजय नगर येथील इमारत क्रमांक २४ मधील एका फ्लॅटचे छत कोसळून (Roof Collapsed) पाच जण जखमी झाले. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी महापालिकेने संपूर्ण इमारत रिकामी करुन स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू केले आहे. (Mira Road Building Roof Collapsed)

हे देखील पाहा -

याप्रकरणी स्थानिक काँग्रेस नेते मोहम्मद उमर कपूर पप्पू यांनी सांगितले की, ही इमारत १९९० च्या सुमारास बांधण्यात आली होती. अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले की, सकाळी ५:५८ वाजता त्यांना अपघाताचा फोन आला. अपघात झाला तेव्हा लोक घरात झोपले होते. २०२ क्रमांकाच्या फ्लॅटची दुरुस्ती नुकतीच केल्याचे नागरिकांनी सांगितले. घरमालकाने आणखी एक मजला लावला होता. त्यांच्या या छोट्याशा चुकीमुळे मोठा अपघात झाला आणि वजन वाढल्याने छत तुटले.

Mira Road Building Roof Collapsed
Ganeshotsav 2022: चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी २ हजार ३१० ज्यादा बसेस सोडण्यात येणार

या इमारतीमधील फ्लॅट क्रमांक २०२ च्या हॉलचे छत कोसळून तळमजल्यावरील फ्लॅट क्र. १०२ वर पडले. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मनीषा (५९), मुकेश (३२), शीतल (४३), अनिता (२२) आणि सिद्धार्थ (११) यांचा समावेश आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com