Ganeshotsav 2022: चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी २ हजार ३१० ज्यादा बसेस सोडण्यात येणार

ST Buses For Konkan In Ganeshotsav: या ज्यादा गाड्या कोकणात जाण्यासाठी २५ ऑगस्टपासून सुरु होणार आहेत, तर परतीच्या प्रवासासाठी ५ ऑगस्टपासून सुरु होणार आहेत.
Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022Saam TV
Published On

निवृत्ती बाबर

मुंबई: येत्या ३१ ऑगस्टला गणरायाचं आगमन होणार आहे. गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2022) कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खूशखबर आहे. एसटी महामंडळाकडून यंदा कोकणात जाण्यासाठी २ हजार ३१० गाड्या (ST Buses) सोडण्यात येणार आहे. अतिवृष्टी, दरड कोसळणे अशा घटना घडल्यास अथवा रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास कोकणातील प्रमूख स्थानकात १०० अतिरिक्त गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. तसेच महाड, चिपळूण आणि रत्नागिरी येथे महामंडळाकडून आपातकालीन परिस्थितीसाठी १०० अतिरिक्त गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. (Ganeshotsav Buses For Konkan)

हे देखील पाहा -

Attachment
PDF
Ganeshotsav Buses 2022 For Konkan.pdf
Preview

गणेशोत्सव, कोकण आणि चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी ज्यादा एसटी बसेस धावत असतात, म्हणूनच राज्य परिवहन महामंडळाने यावेळी २ हजार ३१० ज्यादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या ज्यादा गाड्या कोकणात जाण्यासाठी २५ ऑगस्टपासून सुरु होणार आहेत, तर परतीच्या प्रवासासाठी ५ ऑगस्टपासून सुरु होणार आहेत.

Ganeshotsav 2022
Wardha: नागपूर पोलिसांचा फोन अन् ५० व्या मिनिटाला वर्धा पोलिसांनी खूनातील आरोपीला केलं जेरबंद

दरड कोसळणे, अतिवृष्टीमुळे रेल्वे, रस्ते सेवा कोलमडल्यास महाड, चिपळूण व रत्नागिरी या बसस्थानकावर १०० जादा बसेस तैनात करण्यात येणार आहेत. जेणेकरून कोकणातील भाविक प्रवाशांची ऐनवेळी गैरसोय टाळता येईल. यंदा २७ ते ३१ ऑगस्ट दरम्यान या आपत्कालीन परिस्थितीसाठी गाड्या तैनात असतील. यंदा गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होईल व ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २३ मिनिटांनी समाप्त होईल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com