अक्षय बडवे
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना कंबर कसली आहे. भाजपने देखील देखलभरात जोरदार तयारी सुरु केली आहे. देशभारतील मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा पुण्यातून निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र भाजपने याबाबतचं वृत्त फेटाळलं आहे.
राज्याच्या राजकारणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चर्चा सुरु झाली आहे. या संदर्भात सुरु असलेल्या चर्चा भाजपने फेटाळून लावल्या आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवतील, यासंदर्भातील बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे भाजपचे नेते संजय काकडे यांनी स्पष्ट केले आहगे. मात्र नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर फायदाच होईल, असंही त्यांनी म्हटलं. (Political News)
संजय काकडे यांनी नरेंद्र मोदींनी पुण्यातून निवडणूक लढावी म्हणून पत्र देखील लिहिले आहे. नरेंदी मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर राज्यात 48 पैकी 48 जागा जिंकू येतील. पुणे शहर आणि राज्याचे भाग्य उजळेल, असंही संजय काकडे यांनी म्हटलं. (Latest News Update)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.