Devendra Fadnavis Audio Clip : शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर सस्पेंड करेन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महावितरण अधिकाऱ्यांना तंबी

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर दिसत आहेत.
Devendra FaDNAVIS
Devendra FaDNAVISSaam TV
Published On

संदीप भोसले

Latur News :

अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पावसाने ओढ दिल्याने वाया गेला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक आहे.

त्यात महावितरणच्या ठिसाळ कारभाराचा फटकाही शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. याच मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलं आहे.

Devendra FaDNAVIS
Rain Update News: राज्यात 123 वर्षांत ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस; पुणे IMD ची माहिती...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर दिसत आहेत. लातूरच्या औसा इथं शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी अभिमन्यू पवार यांनी महावितरणच्या कारभाराचा शेतकऱ्यांना कसा फटका बसतोय याची माहिती देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन दिली. (Latest News Update)

Devendra FaDNAVIS
September Rain Forecast : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, सप्टेंबरमध्ये पावसाचं जोरदार कमबॅक? IMD ची महत्त्वाची माहिती

यावर देवेंद्र फडणवीस यांनीही फोनवरुन अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. दरम्यान शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करा, अन्यथा सस्पेंड करेन. शेतकरी आधीच अडचणीत आहे. शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणू नका. तात्काळ त्यांना विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवून द्या, अशा सूचनाही यावेळी देवेंद्र फडवणीस यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com