September Rain Forecast : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, सप्टेंबरमध्ये पावसाचं जोरदार कमबॅक? IMD ची महत्त्वाची माहिती

Rain Update : सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण कसं असेल याकडे शेतकऱ्यांसह अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.
Rain
Rain SaamTv
Published On

Mumbai News : राज्यभर पावसाची स्थिती चिंताजनक बनली आहे. जून महिन्या सरासरीपेक्षा कमी पाऊस, त्यानंतर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने जून महिन्याची पावसाची कमतरता भरुन निघाली. मात्र ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्याने राज्यावर दुष्काळाचं सावट आहे.

आता सप्टेंबर महिन्यात पावसाचं प्रमाण कसं असेल याकडे शेतकऱ्यांसह अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. पावसाअभावी उभी पिकं करपली तर येत्या काळात पाऊस पडला नाहीतर अनेक भागात पाणीटंचाईलाही सामोरं जावं लागू शकतं. (Mumbai News)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्यात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सप्‍टेंबरमध्‍ये येणार्‍या 4 आठवड्यांसाठी हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे. (Latest Marathi News)

Rain
Chandrayaan 3 Update : चंद्रावर लँडर-रोव्हरचं चाललंय काय? इस्रोचं मजेशीर ट्वीट, तासाभरात दोन VIDEO केले शेअर

सप्‍टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यामध्‍ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबरमध्ये मध्यापर्यंत चांगला पाऊस पडू शकतो,  असा अंदाज आहे. दक्षिण द्वीपकल्प, महाराष्‍ट्रात मराठवाडा, कोकण, गोवा यासह मध्य भारतातील काही भागांत पावसाच्या चांगल्या पुनरागमनाची शक्‍यता आहे.

Rain
Beed Farmer End Life: पावसाअभावी शेतातील पीक करपू लागले, चिंताग्रस्त शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा ५८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ७० ते ८६ टक्क्यांपेक्षा कमी झाला. एकाही जिल्ह्याची पावसाची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा जास्त नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात पाऊस सुरु होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल ही अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com