Chandrayaan 3 Update : चंद्रावर लँडर-रोव्हरचं चाललंय काय? इस्रोचं मजेशीर ट्वीट, तासाभरात दोन VIDEO केले शेअर

Moon Mission : इस्रोने दोन व्हिडीओ ट्वीट करत महत्त्वाचं संशोधन आणि रोव्हरचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.
Chandrayaan 3
Chandrayaan 3 Saam TV
Published On

Chandrayaan 3 News :

चांद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर चंद्रावर काय संशोधन सुरु आहेत, याची माहिती इस्रो मागील आठवडाभरापासून देत आहे. याशिवाय प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर चंद्रावर नेमकं काय करत आहेत, याचे फोटो आणि व्हिडीओ जगाभरातील लोकांना दिसावे, यासाठी सोशल मीडियावर शेअर करत आहे.

चांद्रयान ३ चंद्रावर उतरल्यानंतर आठव्या दिवशीही इस्रोने एक नवी अपडेट दिली आहे. इस्रोने दोन व्हिडीओ ट्वीट करत महत्त्वाचं संशोधन आणि रोव्हरचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे.

Chandrayaan 3
Girl Fall from Building : अतिउत्साहात खिडकीवर चढून डान्स करुन लागली अन् अचानक खाली पडली, बर्थडे गर्लचा VIDEO Viral

पहिल्या ट्वीटमध्ये इस्रोने लिहिलं की, चांद्रयान-3 ज्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे तिथे चंद्राची माती आणि खडक कशापासून बनलेले आहेत? इतर उंच प्रदेशांपेक्षा ते कसे वेगळे आहे? या प्रश्नांची उत्तरे चांद्रयान-३ रोव्हर आपल्या उपकरणांच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न करत आहे. (Viral News)

अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) ऑनबोर्ड रोव्हर चंद्रावरील बारीक गोष्टींचं निरीक्षण करण्यासाठी खाली तैनात आहे , जो लँडर इमेजरने कॅप्चर केलं आहे. APXSच्या निरीक्षणात अ‍ॅल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह या प्रमुख घटकांव्यतिरिक्त सल्फरही आढळून आलं आहे. रोव्हरवरील LIBS उपकरणाने देखील सल्फरच्या असल्याची पुष्टी केली. या निरीक्षणांच्या आधारावर वैज्ञानिकांना संशोधन सुरू केले आहे. (Latest Marathi News)

Chandrayaan 3
Chandrayaan 3 Update : तो सध्या काय करतो.. चंद्रावरच्या विक्रम लँडरचे 'प्रज्ञान' रोव्हरनं काढले Photo, २ गोष्टी स्पष्ट दिसल्या!

दुसऱ्या ट्वीटमध्ये इस्रोने म्हटलं की, प्रज्ञान रोव्हर त्याच्या सुरक्षित मार्गावर गोल फिरत आहे. रोव्हरचे रोटेशन लँडर इमेजर कॅमेऱ्याने टिपले. चांदोमामाच्या अंगणात एखादे लहान मूल खेळत आहे, तर आई प्रेमाने पाहते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com