Ajit Pawar on One Nation One Election : मोदी सरकारच्या 'वन नेशन, वन इलेक्शन' भूमिकेला अजित पवारांचा पाठिंबा, सविस्तर कारणेही सांगितली

Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेचे स्वागत केलं आहे.
Ajit Pawar on One Nation One Election
Ajit Pawar on One Nation One ElectionSaam TV
Published On

रुपाली बडवे

Mumbai News :

वन नेशन, वन इलेक्शन देशभरात लागू करण्यासाठी मोदी सरकारने हालचाली वाढवल्या आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षेखाली एक समिती यासाठी स्थापन करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेचे स्वागत केलं आहे.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात सातत्याने कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो. (Political News)

Ajit Pawar on One Nation One Election
Sushma Andhare : कलम ३७० हटवून काय दिवे लावले?, 'इंडिया'वर टीका करणाऱ्या भाजपला सुषमा अंधारेंचा खडा सवाल

‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्र सरकारने आता पुढाकार घेतलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेकडे सर्वांनी सकारात्मकपणे पहावे. केंद्राची ही भूमिका समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं.  (Latest News Update)

काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य असतात. परंतु त्या सुधारणा देश आणि लोकहिताच्या असल्या पाहिजेत. केंद्र सरकारने ते धाडस दाखवले आहे. देशातील अनेक राज्यात सातत्याने होत असलेल्या निवडणुकांमुळे शासन, राजकीय पक्ष आणि उमेदवारांचा वारेमाप खर्च होतो. सतत निवडणुका झाल्याने त्या कामात प्रशासनाचा मौलिक वेळ वाया जातो. त्याचा विकासकामांना फटका बसतो. त्यामुळे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही आवश्यक बाब होती, असं म्हणत अजित पवार यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे.

Ajit Pawar on One Nation One Election
Devendra Fadnavis On Opposition Parties: मोदींना मनातून काढू शकत नाही, देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितले

केंद्राच्या या भूमिकेमुळे देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. यापूर्वी ‘वन नेशन, वन टॅक्स’ हा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सर्व राज्यांच्या सहमतीने अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला. त्याच धर्तीवर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल, हा विश्वास आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेचे स्वागत करतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com