Devendra Fadnavis On Opposition Parties: मोदींना मनातून काढू शकत नाही, देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितले

Mumbai India Meeting: 'इंडियाला कुठलाही अजेंडा नाही. अजेंडालेस अशाप्रकारचा हा अलायन्स आहे.', अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
Devendra Fadnavis On Opposition Parties
Devendra Fadnavis On Opposition PartiesSaam tv
Published On

संजय डाफ, नागपूर

Nagpur News: मुंबईमध्ये होत असलेल्या विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीवर (India Aghadi Meeting) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी टीका केली. 'इंडिया अलायन्स तयार झालंय. या इंडियाला कुठलाही अजेंडा नाही. अजेंडालेस अशाप्रकारचा हा अलायन्स आहे. फक्त मोदीजी (PM Narendra Modi) हटाव एवढा एकमेव अजेंडा घेऊन ते आले आहेत. पण ते मोदीजींना मनातून काढू शकत नाही.', असं वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

Devendra Fadnavis On Opposition Parties
Rahul Gandhi On Gautam Adani: 'मोदींनी अदानींना एवढी मोकळीक का दिलीय?', राहुल गांधींचा सवाल

नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली. त्यांनी सांगितले की, 'मोदींच्या नेतृत्वामुळे, कर्तृत्वामुळे आणि ज्याप्रकारे देश त्यांनी प्रगतीवर नेलाय. त्यामुळे लोकांच्या मनात सध्या मोदी आहेत. गरीब कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबवला त्यामुळे खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या मनात मोदीजी आहेत.

Devendra Fadnavis On Opposition Parties
Mantralaya News: मंत्रालयात खळबळ, बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यानंतर उडाला गोंधळ

तसंच, देशाचा विचार करण्याचं काम मोदीजींनी केले म्हणून मोदीजी लोकांच्या मनात आहेत आणि म्हणून हे जे काही या पार्टी एकत्र आल्या आहेत ते देशाचा विचार करण्याकरता एकत्र आल्या नाही. तर आपली राजकारणातली दुकान बंद होत आहेत. हे दुकान कसे वाचवायचे याकरिता हे एकत्र आले आहेत.', असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

Devendra Fadnavis On Opposition Parties
India Alliance News: इंडियाच्या बैठकीसाठी ग्रँड हयातमध्ये 80 टक्के रुम बूक; प्रत्येक रुमचं भाडं, जेवण, नाश्तासाठीही रग्गड खर्च

त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'आतापर्यंत पाच पक्षांनी पंतप्रधान पदावर दावा ठोकला आहे. यांनी कितीही ठरवलं तरी जनतेला पटलं पाहिजे. यांचा कोणताही उमेदवार जनतेला पटत नाही.' तसंच, 'ते एकत्रित येऊन आणि त्या ठिकाणी बॅनरबाजी करून आणि घोषणाबाजी करून आपला देखील टाईमपास करत आहेत. याचा कोणताही परिणाम होईल असं मला बिलकुल वाटत नाही.' असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com