>> सुरज सावंत
India Alliance Meeting News: देशातील विरोधीपक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडत आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची ही बैठक पार पडत आहे.
देशभरातून येणाऱ्या विरोधीपक्षांच्या नेत्यांसाठी ग्रँड हयातमधील तब्बल २०० रुम बुक केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
ग्रँड हयात हॉटेल मुंबईत नेमकं कुठे आहे? हॉटेल किती अलिशान आहे? या हॉटेलमध्ये राहण्यासाठी एकदा दिवसासाठी किती खर्च येतो? याबाबत सविस्तर माहिती घेऊया. (Latest Marathi News)
'मेक माय ट्रिप' वेबसाईटवरील माहितीनुसार, एका दिवसासाठी १४००० रुपयांपासून ते २१००० रुपयांपर्यंत रुम ग्रँड हयात हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. ग्रँड रुप ट्विन वाथटब, ग्रँड रुप क्विन बाथटब, ग्रँड कोर्डयार्ड व्ह्यू, ग्रँड रुम किंग विथ बाथटब, क्लब रुम असे विविध प्रकारचे रुम हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत.
दरम्यान, या संपूर्ण हाॅटेलमध्ये अंदाजे २५० खोल्या असल्याचं कळते. यातील ८० टक्के खोल्या या इंडियाच्या बैठकिसाठी बुकिंग केल्याची माहिती मिळत आहे. हाॅटेलच्या वेब साईटवर यातील खोल्याची किंमत पुढील प्रमाणे दिली आहे.
या प्रत्येक 1bed खोलीची किंमत एका रात्रीचे अंदाजे १५ हजार ५०० इतक्या आहे. नाश्त्यासह.
2 bed खोलीची किंमत अंदाजे १५ ते २० हजार आहे. नाशत्यासह.
3 bed खोलीची किंमत अंदाजे ३१ ते ३७ हजार इतकी आहे. नाशत्यासह.
4 bed खोलीची किंमत अंदाजे ५२ हजार ते ५७ हजार इतकी आहे. नाश्ता व जेवणासह.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.