Cancer Treatment: 'कॅन्सर'वर जालीम उपाय, एक इंजेक्शन अन् ७ मिनिटात रुग्ण होणार बरा

Cancer Treatment Injection: शास्त्रज्ञांनी कॅन्सरच्या उपचारासाठी एक इंजेक्शन विकसित केले आहे. ज्यामुळे या आजाराच्या उपचारात लागणारा वेळ कमी होऊ शकतो.
Cancer Treatment
Cancer TreatmentSaam Tv

Cancer Treatment Injection News:

जगभरात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दरवर्षी वाढत आहे. फुफ्फुसाच्या कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणे पुरुषांमध्ये आणि स्तनाचा कॅन्सर महिलांमध्ये आढळतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. आजपर्यंत कॅन्सर रोखण्यासाठी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नव्हती. या रोगाची बहुतेक प्रकरणे शेवटच्या टप्प्यात असतानाच समोर येताना पाहायला मिळत आहे.

अशा परिस्थितीत उपचार करणे हे डॉक्टरांसमोर एक आव्हान होते. अनेक प्रकरणांमध्ये रुग्णावर वर्षानुवर्षे उपचार सुरू राहतात. मात्र आता हा आजार रोखण्यात एक जालीम उपाय सापडला आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांनी कॅन्सरच्या उपचारासाठी एक इंजेक्शन विकसित केले आहे. ज्यामुळे या आजाराच्या उपचारात लागणारा वेळ कमी होऊ शकतो. इंजेक्शनद्वारे औषध देखील दिले जाईल, ज्यामुळे कॅन्सरच्या पेशी कमी होण्यास मदत होईल.

Cancer Treatment
Special Session of Parliament : मोदी सरकारनं बोलावलं संसदेचं विशेष अधिवेशन; कधीपासून आणि काय होणार नेमकं?

मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी हे इंजेक्शन विकसित केले आहे. इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने म्हटले आहे की, Atezolizumab नावाचे हे इंजेक्शन कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखेल. हे इंजेक्शन त्वचेखाली लावले जाईल. इंजेक्शन पूर्णपणे शरीरात इंजेक्ट करायलासात मिनिटे लागणार असून अवघ्या अर्ध्या तासात त्याचे काम सुरू होईल.   (Latest Marathi News)

यापूर्वी कॅन्सरच्या रूग्णांमध्ये ड्रिपद्वारे औषध इंट्राव्हेनसद्वारे दिले जात होते. ज्यासाठी 30 मिनिटे किंवा एक तासही लागत होता. परंतु हे इंजेक्शन थेट त्वचेवर लावले जाईल. यास फक्त सात मिनिटे लागतील. त्यामुळे कॅन्सरच्या उपचारात लागणारा वेळ वाचेल.

Cancer Treatment
Adani Group Share News: हिंडेनबर्गनंतर आणखी एका संस्थेचा अदानी ग्रुपवर गंभीर आरोप, शेअर मार्केटमध्ये मोठा फटका

Atezolizumab ही इम्युनोथेरपी उपचार आहे. हे शरीरातील कॅन्सरच्या पेशी शोधून त्यांचा नाश करेल. हे उपचार केमो आणि रेडिओथेरपीपेक्षा कमी वेळेत केले जातील. सध्या फुफ्फुस, स्तन आणि यकृताच्या कॅन्सर रुग्णांना हे उपचार दिले जाणार आहेत. यामुळे कॅन्सरचे उपचार सोपे होण्यासाठी खूप मदत होईल. रुग्णांना जास्त काळ उपचार घ्यावे लागणार नाहीत. औषध थोड्याच वेळात शरीरात जाईल आणि कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याचे काम करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com