Sushma Andhare : कलम ३७० हटवून काय दिवे लावले?, 'इंडिया'वर टीका करणाऱ्या भाजपला सुषमा अंधारेंचा खडा सवाल

Political News : आशिष शेलार यांनी २६/११ बद्दल एक प्रश्न विचारला. आता साध्वी प्रज्ञा कोण आहेत हे त्यांनी सांगावं.
Sushma Andhare
Sushma AndhareSaam TV
Published On

अक्षय बडवे

Pune News :

देशभरारातील विरोधीपक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईत पार पडत आहे. या बैठकीवर भाजपसह विरोधीपक्षांनी सडकून टीका केली आहे. या टीकाकारांना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

काल आणि आज इंडियाची बैठक सुरू आहे. २८ पक्ष एकत्र आले आहेत. भारताच्या लोकशाहीबद्दल चिंतन करण्याचे काम सुरू आहे. २८ पक्षांमध्ये टार्गेट कोण आहे तर ते उद्धव ठाकरे आहेत. आम्हाला आनंद आहे की ये डर होना चाहिये, असा टोलाही सुषमा अंधारे यांनी टीका करणाऱ्यांना लगावला.

ज्या ज्या लोकांनी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले त्यांचे उत्तर मी देते. आशिष शेलार यांनी २६/११ बद्दल एक प्रश्न विचारला. आता साध्वी प्रज्ञा कोण आहेत हे त्यांनी सांगावं. (Political News)

Sushma Andhare
Sudhir Mungantiwar News : 'मला एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबतचा भाजप आवडत नाही...', सुधीर मुनगंटीवार हे काय बोलून गेले?

आशिष शेलार गजनी झालेत?

३७० बद्दल त्यांनी प्रश्न विचारला. पण ३७० हटवल्यामुळे भाजपने काय दिवे लावले? सावरकरांसंदर्भात देखील त्यांनी प्रश्न विचारला. पण आशिष शेलार गजनी झाले आहेत का? आम्ही सावरकार यांच्याबद्दल भूमिका अनेकदा स्पष्ट केली आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं. (Latest News Update)

तुम्ही सैनिकांचे जीव घेतले

आमच्याबद्दल बोलायच्या आधी संभाजी भिडे आणि माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर कारवाई केली का ते सांगा. एअर स्ट्राईकबद्दल तुम्ही बोला. निवडणुकीसाठी तुम्ही सैनिकांचे जीव घेतले, अशी जहरी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.

Sushma Andhare
One Nation, One Election : 'वन नेशन, वन इलेक्शन'साठी मोदी सरकारकडून हालचालींना वेग, उचललं मोठं पाऊल

सूरत, गुवाहाटीच्या खर्चाचा हिशेब द्या

उदय सामंत यांनी इंडियाच्या बैठकीसाठी होणाऱ्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले होते. यावर बोलताना अंधारे यांनी म्हटलं की, आधी तुम्ही उत्तर द्या की सूरत, गुवाहाटीकडे जाण्याचा खर्च, कमांडो आणि सुरक्षा नेली, त्याचा खर्च कसा केला? या खर्चावर कधीतरी बोला. ठाकरे यांना खर्च विचारण्याची तुमची दानत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com