Sudhir Mungantiwar News : 'मला एकनाथ शिंदे, अजित पवारांसोबतचा भाजप आवडत नाही...', सुधीर मुनगंटीवार हे काय बोलून गेले?

Political News : छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSaam TV
Published On

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar News :

भाजप-शिवसेना सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एन्ट्री झाल्याने भाजपमधील नेत्यांमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे. भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या एका वक्तव्याने पुन्हा ही चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचा भाजप आवडत नाही, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याने खळबळ उडाली.

सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचाही भाजप आवडत नाही आणि मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचाही भाजप आवडत नाही. मला देशाची सेवा करणार भाजप आवडतो, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांची घुसमट बाहेर पडल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात ते बोलत होते. (Latest News Update)

Sudhir Mungantiwar
Devendra Fadnavis Audio Clip : शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर सस्पेंड करेन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महावितरण अधिकाऱ्यांना तंबी

मुनगंटीवार यांचा सारवासारवा

मात्र आपल्या वक्तव्यानंतर होणाऱ्या परिणामांची कल्पना येताच सुधीर मुनगंटीवार यांनी सारवासारव केली. आवडायचा प्रश्न असा आहे, की व्यक्तीगत राजकारण आवडत नाही. कोणताही पक्ष हा त्याच्या विचारावर आधारीत आवडला पाहिजे.व्यक्तीवर आधारीत पक्ष आवडतो का. हेच दोन पक्षातील राजकारणात फरक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा पाठिंबा दिला जातो तेव्हा तो व्यक्ती आणि तो पक्ष आम्हाला निश्चित आवडणार आहे, असं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. (Political News)

Sudhir Mungantiwar
Devendra Fadnavis On Opposition Parties: मोदींना मनातून काढू शकत नाही, देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना ठणकावून सांगितले

इंडियावर टीका

कॉंग्रेस आणि शिवसेनेचा शरद पवारांवर विश्वास नाही. India मधून nda काढला तर I आणि I राहतो म्हणजे मी आणि मी. India शब्द इंग्रजांनी दिला. तुम्ही इंग्राजांचा वारसा चालवायचा म्हणून हे नाव दिलं आहे. हिंदुस्थान, भारत का नाही दिलं, अशी विचारणा करते मुनगंटीवार यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com