Nalasopara Crime News : ‘तलवार गॅंग’ प्रकरणातील दाेघांना अटक, अल्पवयीन मुलावर पेल्हार पोलिसांची पाळत

अल्पवयीन मुलाचा शाेध सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वसंत लब्धे यांनी दिली.
youth, pelhar police, nalasopara crime news
youth, pelhar police, nalasopara crime newsSaam Tv

Nalasopara News : नालासोपाऱ्यातील ‘तलवार गॅंग’ प्रकरणात पेल्हार पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पाेलिसांनी त्यांच्याकडून ५ तलवारी, ४ खंजीर, १८ कोयते असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. (Maharashtra News)

youth, pelhar police, nalasopara crime news
Ravikant Tupkar vs Raju Shetti : अखेर राजू शेट्टींनी रविकांत तुपकरांना सुनावलं

एका चित्रफितीमधून या तलवार गॅंगचा दहशत माजविण्याचा प्रकार समोर आला होता. ३ ऑगस्ट रोजी समाज माध्यमांवर (Social Media) एक चित्रफित प्रसारीत झाली होती. त्यामध्ये नालासोपाऱ्यातील संतोष भुवन परिसरात काही तरूण हातात तलवार घेऊन दहशत माजवत होते. याप्रकरणाने परिसरात घबराट पसरली होती.

youth, pelhar police, nalasopara crime news
Satara News : ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे

पेल्हार पोलिसांनी (police) चित्रफितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणी साहिल सारवा (२२) आणि विनोद नागर (३२) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ तलवारी, ४ खंजीर, १८ कोयते एक वाहन असा ३ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

youth, pelhar police, nalasopara crime news
World Archery Championships 2023: साता-याच्या आदिती स्वामीने रचला इतिहास, जागतिक तिरंदाजीत 'सुवर्ण'; ठरली पहिली भारतीय महिला खेळाडू (पाहा व्हिडिओ)

चित्रफितीत तलवार घेऊन फिरणार्‍या संशियतांची ओळख पटली आहे. त्यातील एक विधीसंघर्ष बालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा ठावठिकाणा समजला असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके गुजरातला रवाना झाल्याची माहिती वऱिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com