Swabhimani Shetkari Sanghatana News : पेल्यातले वादळ पेल्यातच संपून जाईल असा विश्वास व्यक्त करणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (swabhimani shetkari sanghatana leader raju shetti) यांनी आज (शनिवार) रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी माध्यमांशी न बाेलता त्यांचे म्हणणे शिस्त पालन समितीच्या बैठकीत मांडावे असे नमूद करीत स्वाभिमानी हायजॅक करणे इतकं सोपं नाही असा इशारा देखील दिला आहे. शेट्टी हे पंढरपूरात माध्यमांशी बाेलत हाेते. (Maharashtra News)
राजू शेट्टी यांच्या कार्यप्रणालीच्या विराेधात रविकांत तुपकर यांनी आवाज उठविला आहे. त्यावर यापुर्वीही आणि आजही राजू शेट्टींनी रविकांत तुपकर यांनी माध्यमांसमोर न बोलता येत्या 8 ऑगस्टला शिस्त पालन समितीची बैठकीत बोलावे असे म्हटले. त्यांच्या शंकेच निरसन करावे. दरम्यान स्वाभिमानी हायजॅक करणे इतकं सोपं नाही असेही राजू शेट्टींनी म्हटले आहे.
शेट्टींनी यांनी अन्य प्रश्नांवर बाेलताना दुधाच्या दराचा प्रश्न सोलापूर, सांगली, नगर जिल्हात गंभीर आहे. मंत्री लक्ष देत नाहीत. दुधाचे बोके जे आहेत त्यांची इडी चौकशी करावी म्हणजे काळा पैसा बाहेर येईल असेही त्यांनी नमूद केले.
राहुल गांधी यांच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर हायकोर्टाच्या कार्यपद्धती बद्दल लोकांच्या मनात संशय आहे. एनडीए आणि इंडिया मध्ये न जाता स्वतंत्र तिसरी आघाडी घेऊन लढणार असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले.
संभाजी भिडेंना अभय दिलं जातेय
महापुरुषांची आपण पूजा करतो. येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर , महात्मा गांधी साऱ्या जगाची दैवते आहेत. यांच्या बद्दल अपशब्द करणे चूक आहे. सगळे मोदी चोर म्हंटल्यावर राहुल गांधींवर कारवाई होते मग भिडेंवर का कारवाई नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.