Vasai Panvel Local: पनवेल ते वसई लोकल सुरू होणार, 17 स्थानकांचा असणार रेल्वे मार्ग; 12 हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे

Panvel Vasai Local Train: पनवेल ते वसई थेट लोकल ट्रेन सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 12,710 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला असून 69.23 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 17 स्थानकांचे नियोजन आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर प्रकल्पाच्या पुढील कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Vasai Panvel Local
Vasai Panvel Localsaam tv
Published On: 

मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पनवेल ते वसईदरम्यान थेट लोकल सुरू करण्याच्या हालचालींना वेग आलाय. या मार्गासाठी तब्बल 12 हजार 710 कोटी 82 लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय. या रेल्वे मार्गाची लांबी 69.23 किलोमीटर असणार असून त्यावर एकूण 17 स्टेशन उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या (MUTP-3B) अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रवास अधिक सोपा होऊ शकतो.

पनवेल ते वसई थेट लोकलने जोडले जाणार?

सध्या पनवेलहून वसई-विरारला जाण्यासाठी थेट लोकल उपलब्ध नाही. त्यामुळे या भागात जाणाऱ्या प्रवाशांना कुर्ला, दादर किंवा इतर स्थानकांवर उतरून दुसरी लोकल पकडावी लागते. यामुळे प्रवासासाठी जास्त वेळ लागतो. प्रवाशांना बदलत्या लोकलमुळे त्रासही सहन करावा लागतो.

Vasai Panvel Local
Vande Bharat Express: कोकणवासियांसाठी गुड न्यूज! दिवाळीनिमित्त रेल्वेकडून मोठं गिफ्ट, १६ डब्यांची वंदे भारत धावणार

परंतु पनवेल-वसई रेल्वे मार्ग तयार झाल्यास पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. याचा फायदा नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा वेळ वाचू शकणार आहे. सध्या हा प्रकल्प प्रस्तावाच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लोकल सुरू होण्यासाठी केंद्राची मंजुरी आणि त्यानंतरची कामं पूर्ण होणं गरजेचं आहे.

69.23 किलोमीटरचा मार्ग, 17 स्टेशनची उभारणी

पनवेल-वसई रेल्वे मार्गाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

  • एकूण लांबी- 69.23 किलोमीटर

  • प्रस्तावित खर्च- 12,710 कोटी 82 लाख रुपये

  • एकूण स्थानके- 17

  • उन्नत रेल्वे मार्ग- सुमारे 28 किलोमीटर

  • प्रकल्प- मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP-3B)

या मार्गावर अनेक महामार्ग, खाड्या आणि इतर भौगोलिक अडचणी आहेत. त्यामुळे सुमारे 28 किलोमीटरचा रेल्वे मार्ग उन्नत म्हणजेच जमिनीपासून उंचीवर बांधण्याचं नियोजन आहे. या अडथळ्यांचा विचार करून संपूर्ण रेल्वे मार्गाची उभारणी केली जाणार आहे.

नवी मुंबई, भिवंडी आणि वसई-विरारमधील प्रवाशांना फायदा

नवी मुंबई, भिवंडी आणि वसई-विरार या भागांमध्ये गेल्या काही काळात निवासी वसाहती, उद्योग आणि व्यवसायांची केंद्रं वाढतंय. या भागांमध्ये रोजगाराच्या संधीही वाढत असल्याने दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतेय. त्यामुळे या परिसरात सार्वजनिक वाहतुकीची गरज अधिक जाणवत आहे.

Vasai Panvel Local
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! मुंबई-बेंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेन हाऊसफुल्ल! तिकीटही मिळेना, कधीपर्यंत आहे वेटिंग?

पनवेल-वसई रेल्वे मार्ग सुरू झाल्यास या भागांना मुंबईच्या उपनगरी रेल्वे जाळ्याशी जोडणं सोपं होणार आहे. तिसरी आणि चौथी मुंबई म्हणून विकसित होत असलेल्या नव्या शहरांच्या दळणवळणासाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरू शकतो. यामुळे रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना प्रवासासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

आता केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा

पनवेल-वसई रेल्वे प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने यापूर्वीच मंजुरी दिलीये . त्यानंतर आता या प्रकल्पासाठी 12 हजार 710 कोटी 82 लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय. केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून आवश्यक प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील कामांना सुरुवात होऊ शकणार आहे.

त्याचप्रमाणे पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे मार्गाचे जवळपास 99 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहितीये. पनवेल परिसरातील रेल्वे सुविधांचा विस्तार होत असतानाच आता पनवेल-वसई रेल्वे मार्गाकडेही प्रवाशांचे लक्ष लागलंय.

Vasai Panvel Local
Pension Rules : सेवानिवृत्तीनंतर पुन्हा सरकारी नोकरी मिळाली, तर पूर्ण पगार अन् पेन्शन किती मिळणार? न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

पनवेल-वसई रेल्वे कॉरिडॉरमुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास अधिक सोपा होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई, भिवंडी आणि वसई-विरारमधील नागरिकांना याचा फायदा होऊ शकतो. पण या प्रकल्पाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी कधी मिळणार, प्रत्यक्ष बांधकाम कधी सुरू होणार आणि लोकल सेवा कधी सुरू होणार, याबाबत अद्याप कोणतीही निश्चित माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.