वंदे भारतमध्ये प्रवाशांची सर्वाधिक पसंती प्रथम श्रेणीला मिळाली आहे. द्वितीय आणि तृतीय श्रेणीसाठी आरक्षण पूर्ण झाल्याने त्यांची प्रतीक्षायादी सुरू झाली आहे. मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या 'वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस' ला प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. रस्त्यावरील १७ ते २२ तासांच्या प्रदीर्घ प्रवासाला पूर्णविराम देत अवघ्या १६ तासांत आरामदायी प्रवास घडवून आणणाऱ्या या ट्रेनने प्रवाशांना अक्षरशः भुरळ घातली आहे.
इतर नेहमीच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत या हाय-स्पीड ट्रेनचे तिकीट दर काहीसे अधिक आहेत. सध्या या गाडीत प्रवासासाठी हे ३-टायर एसी 3AC २,८१०, २-टायर एसी 2A ३,६३०, १-टायर एसी 1AC ४,४५० दर निश्चित करण्यात आले आहेत. एवढे तिकीट दर असतानाही आगामी अनेक दिवसांचे बुकिंग फुल्ल झाले असून बहुतांश प्रवाशांना लांबच लांब प्रतीक्षायादीला Waiting List सामोरे जावे लागत आहे. नोव्हेंबरच्या गर्दीच्या काळात तर अनेक प्रवाशांना आरक्षण बंद स्थितीचा सामना करावा लागत आहे.
सध्या मुंबई-बेंगळुरू दरम्यान धावणाऱ्या खाजगी लक्झरी एसी बसेसचे भाडे अगदी ५,८०० रुपयांपर्यंत वसूल केले जाते. त्या तुलनेत वंदे भारत स्लीपरचा प्रवास अधिक सुरक्षित, वेळेची बचत करणारा आणि आधुनिक सुविधांनी युक्त आहे. त्यामुळे व्यावसायिक, आयटी क्षेत्रातील कर्मचारी आणि पर्यटकांची पहिली पसंती या ट्रेनलाच मिळत आहे. प्रवासाचा वेळ वाचवणारा वेग आणि प्रीमियम सोयीसुविधांमुळे प्रीमियम तिकीट दर असूनही ही वंदे भारत स्लीपर भारतीय रेल्वेसाठी अत्यंत यशस्वी ठरत आहे.
२ नोव्हेंबरला पहिल्यांदा मुंबईहून बंगळुरुला रवाना झालेल्या एक्स्प्रेसचे १०० टक्के आरक्षण झाले होते. ४ नोव्हेंबरच्या प्रवासासाठी प्रथम श्रेणीची प्रतीक्षा यादी १९, द्वितीय श्रेणीची ४६, तर तृतीय श्रेणीची १०४ आहे. ५ नोव्हेंबरला प्रथम श्रेणीचे आरक्षण मिळणे बंद (रिग्रेट) झाले असून, द्वितीय आणि तृतीय श्रेणीत अनुक्रमे ६१ आणि १११ प्रतीक्षा यादी आहे. ६ नोव्हेंबरला प्रथम श्रेणीची प्रतीक्षा यादी ३०, तर द्वितीय आणि तृतीय श्रेणीची अनुक्रमे ८७ आणि १६८ आहे. ७ नोव्हेंबरला प्रथम श्रेणी पुन्हा ‘रिग्रेट‘ झाली आहे. ८ नोव्हेंबरला प्रथम श्रेणीची प्रतीक्षा यादी १७ असताना द्वितीय श्रेणीची ४० आणि तृतीय श्रेणीची ६१ आहे. ९ आणि ११ नोव्हेंबरलाही प्रथम श्रेणीचे आरक्षण ‘रिग्रेट‘ स्थितीत पोहोचले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.