मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पनवेल-कर्जत लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा; 15 डिसेंबरला महत्वाचा टप्पा पार पडणार

Panvel Karjat Local Train Corridor Latest Update 2026: पनवेल-कर्जत नव्या रेल्वे कॉरिडॉरवर १५ डिसेंबर २०२६ पासून ओव्हरहेड वायरमध्ये वीजपुरवठा सुरू होणार आहे.
PanvelKarjatRailway
PanvelKarjatRailwaysaam tv
Published On: 

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत आणखी एका नव्या कॉरीडोरची भर पडण्याच्या दिशेने काम वेगाने सुरू आहे. पनवेल ते कर्जतदरम्यान उभारण्यात येत असलेल्या 29.6 किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्गावर 15 डिसेंबर 2026 पासून ओव्हरहेड वायरमध्ये वीजपुरवठा सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने याबाबत माहिती दिली आहे. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर या मार्गावर तांत्रिक तपासणी आणि लोकल ट्रेनच्या चाचण्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, प्रवासी सेवा सुरू करण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा तपसणी आणि रेल्वेची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.

PanvelKarjatRailway
Dombivli News : नळ उघडताच पाण्यात दिसल्या लालसर अळ्या; डोंबिवलीमध्ये धक्कादायक प्रकार उघड

पनवेल-कर्जतदरम्यान थेट रेल्वे कनेक्टीव्हिटी

पनवेल-कर्जत हा नवा रेल्वे कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर दोन्ही शहरांमध्ये थेट उपनगरीय रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. सध्या या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक अंतराचा प्रवास करावा लागतो. मात्र, नवीन रेल्वे मार्गामुळे प्रवाशांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच कल्याण रेल्वे मार्गावरील गर्दी आणि प्रवाशांचा ताण कमी होण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.

PanvelKarjatRailway
तुकाराम मुंढेंच्या 'एफडीए'ची मोठी रेड! दिवाळीच्या तोंडावर 'या' १४ आस्थापनांवर कारवाई; भेसळयुक्त अन्नाचा मोठा साठा जप्त

नव्या रेल्वे मार्गावर असणार 5 स्थानके

सुमारे 2 हजार 782 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. कॉरिडॉरवर एकूण पाच स्थानकांचा समावेश असेल.

- पनवेल

- चिखले

- मोहोपे

- चौक

- कर्जत

PanvelKarjatRailway
हिंजवडीत खळबळ! संशयाच्या वादातून सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा मृत्यू; प्रियकर अटकेत

या रेल्वे मार्गावर तीन बोगदे बांधण्यात आले आहेत. त्यापैकी वावर्ले गावाजवळील 2.6 किलोमीटर लांबीचा बोगदा विशेष महत्वाचा आहे. तसेच रेल्वे फ्लायओव्हर, मोठे आणि छोटे पूलही उभारण्यात आले आहेत. MRVC कडून 15 डिसेंबरपासून किंवा त्यानंतर नव्या रेल्वे मार्गाच्या अप आणि डाउन ट्रॅकसह रेल्वे सायडिंग आणि संबंधित अन्य ट्रॅकवरही वीजपुरवठा सुरू केला जाणार आहे. त्यानंतर रेल्वे अधिकारी वीज यंत्रणा, सिग्नलिंग आणि इतर तांत्रिक सुविधांची तपासणी करतील. पुढील टप्प्यात या मार्गावर ट्रेन चालवून चाचणी घेतली जाईल. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण होऊन आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरच या मार्गावर प्रवासी लोकल सेवा सुरू होऊ शकणार आहे.

PanvelKarjatRailway
मुंबईकरांसाठी सर्वात मोठी खुशखबर! अलिबागचा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत; वाचा कधीपासून सुरू होणार नवा मार्ग?

रेल्वे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

ओव्हरहेड वायरमध्ये वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर रेल्वे रुळांजवळ राहणाऱ्या नागरिकांनी आणि त्या परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. वीजवाहक तारांना आणि संबंधित उपकरणांना स्पर्श करू नये, तसेच या तारांमध्ये नेहमीच वीजप्रवाह सुरू असल्याचे गृहीत धरावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, हा नवा रेल्वे कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर पनवेल, नवी मुंबई, कर्जत आणि आसपासच्या वेगाने विकसित होणाऱ्या भागांची रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.