Pune : "तुम्हाला घरपोच दारू मिळेल" होम डिलिव्हरीचे आमिष दाखवून ग्राहकांना लाखोंचा गंडा

Pune Cyber Crime News : पुण्यात घरपोच दारू देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी बनावट वेबसाइट तयार करून १५ ते २० ग्राहकांची फसवणूक केली. क्यूआर कोडद्वारे पैसे उकळून सुमारे एक लाख रुपयांचा गंडा घातला.
Pune Cyber Crime News
Pune Cyber Crime News AI Image
Published On: 
Summary
  • पुण्यात बनावट मद्यविक्री वेबसाइटद्वारे ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

  • घरपोच दारू देण्याचे आमिष दाखवून १५ ते २० ग्राहकांना गंडा

  • क्यूआर कोडच्या माध्यमातून ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे उकळले

दारूची घरपोच डिलिव्हरी मिळेल, या अपेक्षेने ऑनलाइन संपर्क साधणाऱ्या ग्राहकांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका मद्यविक्री दुकानाच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करून ग्राहकांना दारू घरपोच देण्याचे आमिष दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडलेल्या १५ ते २० ग्राहकांना मिळून सुमारे एक लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन चव्हाण (वय ३५) यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यापासून १२ नोव्हेंबरपर्यंत हा प्रकार सुरू होता. सायबर चोरट्यांनी एका मद्यविक्री दुकानाच्या नावाचा वापर करून गुगलवर बनावट वेबसाइट तयार केली होती. या वेबसाइटवर त्यांनी स्वतःचे चार मोबाईल क्रमांक दिले होते. त्यामुळे ग्राहकांना ही वेबसाइट संबंधित दुकानाचीच असल्याचा विश्वास वाटत होता.

Pune Cyber Crime News
Blood Sugar:  शुगर कंट्रोल करण्याचा सर्वात सोपा उपाय! रात्री खोलीत 'ही' एक गोष्ट , रक्तातील साखर राहील एकदम नॉर्मल

मद्य खरेदीसाठी ग्राहकांनी वेबसाइटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधल्यानंतर त्यांना घरपोच मद्य देण्याचे आश्वासन दिले जात होते. ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्याकडून ऑनलाइन पैसे मागवले जात होते. त्यासाठी ग्राहकांना क्यूआर कोड पाठवण्यात येत होता. ग्राहकांनी या कोडच्या माध्यमातून पैसे पाठवले; मात्र पैसे मिळाल्यानंतर त्यांना मद्याची डिलिव्हरी देण्यात आली नाही. अशा प्रकारे अनेक ग्राहकांची फसवणूक करण्यात आली.

Pune Cyber Crime News
Shocking : मोठी बातमी! भाजप नेत्याच्या धावत्या कारला भीषण आग; दोघांनी कारमधून उडी मारली अन्...

या बनावट वेबसाइटच्या माध्यमातून आतापर्यंत १५ ते २० ग्राहकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांकडून मिळून जवळपास एक लाख रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोणत्याही अनोळखी वेबसाइटवर विश्वास ठेवून पैसे पाठवू नयेत. संबंधित दुकानाची अधिकृत वेबसाइट आणि संपर्क क्रमांक तपासूनच व्यवहार करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.