NCP Political Crisis: राष्ट्रवादीकडून मोठी कारवाई सुरू; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदाराला केले बडतर्फ

राष्ट्रवादीने मोठी कारवाई करत शिवाजीराव गर्जे पक्षातून बडतर्फ केले आहे.
NCP Political Crisis:
NCP Political Crisis:Saam TV
Published On: 

Mumbai News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांच्या गटाच्या वेगळ्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीने कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रवादीने मोठी कारवाई करत शिवाजीराव गर्जे पक्षातून बडतर्फ केले आहे. (Latest Marathi News)

अजित पवारांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांसोबत शपथविधीला हजर राहणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने पहिली मोठी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार शिवजीराज गर्जे यांना पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याचे कारण देत सदस्यत्व आणि पक्षाच्या सरचिटणीस पदावरून बडतर्फ केले आहे.

NCP Political Crisis:
Sharad Pawar Statement: शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार का? एका वाक्याने सगळ्यांचे कान टवकारले

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही पहिली कारवाई केली आहे. जयंत पाटील यांनी शिवजीराज गर्जे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/ मंत्रिदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलात. आपले हे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. आपली कृती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत आहे'

NCP Political Crisis:
Maharashtra Politics News: मोठी बातमी! अजित पवारांसह ९ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई; शपथविधीला गेलेले सर्व नेतेही बडतर्फ

'तसेच पक्षाच्या सदस्यत्वावरुन व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे. तसेच आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशी सूचना जयंत पाटील यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com