Satara News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज साताऱ्यातील (Satara) कराडमध्ये शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर त्यांनी सातारा सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीत बंडखोरी करुन शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde- Fadnavis Government) पाठिंबा दिलेल्यांवर जोरदार निशाणा साधला.
'मला कशाच दुःख नाही. अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे. माझा आशीर्वाद घेऊन निर्णय घेतल्याचं सांगून संभ्रम निर्माण केला गेला. सोडून गेलेले अनेक जण योग्यवेळी निर्णय जाहीर करतील.' असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा भाकरी फिरवणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
शरद पवार यांनी सांगितले की,'सातारा आणि कोल्हापूरने राष्ट्रवादीला महाराष्ट्रात बळ दिलं. ज्यांच्याविरोधात आमचा संघर्ष त्यांच्योसोबतच आमचे सहकारी गेले. पण नव्या पीढिला आम्ही नाऊमेद होऊ देणार नाही. राष्ट्रवादी मजबूत करायला पुन्हा एकदा उभं राहणार आहे. नव्या कार्यकर्त्यांना संधी देत महाराष्ट्राचं चित्र पाटलणार आहे. नवीन पिढीने जोमाने काम करावं म्हणून हा दौरा सुरू केला. तरुणांना दिशा दिली आणि कार्यक्रम दिला तर दोन तीन महिन्यांत राष्ट्रवादी मजबूत होईल.'
तसंच, 'भाजपकडून धार्मिक भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. कराडमध्ये आज नव्या मोहिमेची सुरुवात केली. राष्ट्रवादी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली. मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनी केलेले आरोप हे वास्तववादी आहे. त्यांनी केलं ते चांगले नाही. पण मी राजकारण करणार नाही. फडणवीस यांनाच विचारा की तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीसोबत कसं सरकार तयार केलं.', असे पवारांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केलेल्या आमदारांबाबत घेतलेल्या निर्णयाबद्दल शरद पवारांनी सांगितले की, 'जयंत पाटील यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा अधिकार आहे. जयंत पाटील यांना कारवाईचा अधिकार आहे. जयंत पाटील यांनी घेतलेला निर्णय विचारपूर्वक घेतला असेल. जयंत पाटील हे खूपच शिस्तबद्ध आहेत आणि ते कायद्यानुसारच काम करतात.' तसंच, '1988 मध्येही हिच परिस्थिती निर्माण झाली होती. ३-४ सोडले तर बाकी सर्वजण पराभूत झाले होते.', असे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.