Maharashtra Politics News: मोठी बातमी! अजित पवारांसह ९ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई; शपथविधीला गेलेले सर्व नेतेही बडतर्फ

शपथविधी घेतलेल्या नऊ आमदारांवर पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
Maharashtra Political News
Maharashtra Political NewsSaam tv
Published On

Ajit Pawar NCP News:  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदार शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्याकडून आमच्यासोबतच संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला आहे.

तर शरद पवार यांनी पुन्हा पक्षाची मोर्चेबांधणी करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची सर्वात मोठी घडामोड समोर आली असून काल शपथविधी घेतलेल्या नऊ आमदारांवर पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

Maharashtra Political News
Shirdi Saibaba Gold Crown: साईबाबांना अनोखी गुरुदक्षिणा; भक्ताकडून २० लाखाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण

९ आमदारांवर होणार कारवाई...

याबाबत अधिक माहिती अशी की, अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठी फूट पडली आहे. कालच्या शपथविधीनंतर अजित पवार यांनी संपूर्ण पक्ष आमच्यासोबत असल्याचे सांगितले होते. मात्र शरद पवार यांनी या सर्वांची भूमिका पक्षविरोधी असल्याचे सांगत कारवाईला सुरूवात केली आहे.

त्यानंतर आता पक्ष विरोधात जाऊन शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांविरोधात राष्ट्रवादीने कारवाई केली आहे. हा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, अदिती तटकरे आणि धर्माराव बाबा अत्राम यांच्यावर ही कारवाई होणार आहे.

Maharashtra Political News
Sharad Pawar Statement: शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार का? एका वाक्याने सगळ्यांचे कान टवकारले

शपथविधी सोहळ्यातील नेतेही बडतर्फ...

तसेच या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व नेतेही पक्षाकडून बडतर्फ करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकार मध्ये सामील होणाऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्यांना पक्षातून बडतर्फ करीत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रक काढले आहे.

अजित पवारांकडून नविन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती...

तत्पुर्वी, अजित पवार यांनी त्यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादीची पदनियुक्ती सुरू केली आहे. आज सकाळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये सुनिल तटकरे (Sunil Tatkare) हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार हे अधिकृत पत्र काढून त्याबाबत घोषणा करतील, असं सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com