Udayanraje Bhosale: उदयनराजेंची भाजपात घुसमट हाेतेय?

आमदार शशिकांत शिंदे यांनी विराेधकांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला.
udayanraje bhosale
udayanraje bhosalesaam tv
Published On

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेची (navi muncipal corporation) प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली आहे. या प्रभाग रचनेवर भाजपने (bjp) मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या आहेत. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) सुद्धा हरकती घेणार आहे. ज्या ठिकाणी चुकीची प्रभाग रचना असेल त्या ठिकाणी आम्ही हरकती घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे (shashikant shinde) यांनी माहिती दिली

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार शशिकांत शिंदे यांनी यांनी साम टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राष्ट्रवादी काॅंग्रेसची विचारधारा आणि ज्येष्ठ नेते पक्षाध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांना मानणारा नवी मुंबईतील (navi mumbai) मतदार याविषयी सविस्तर मतं मांडलं. तसेच विराेधकांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला.

udayanraje bhosale
Nitesh Rane: जामीन देताना कोर्टाने घातल्या 'या' अटी; ४ तासापासून राणेंनी अन्न खालेलं नाही, आज हाेणार अँजिओग्राफी?

दरम्यान सातारा (satara) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी मी दुस-या दिवसापासून कामाला लागलाे. प्रयत्न करणे हे आपल्या हातात असतं असं आमदार शशिकांत शिंदेंनी एका प्रश्नावर उत्तर दिलं.

खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) हे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटले. त्यावर आमदार शिंदे म्हणाले दाेन्ही नेत्यांकडे दूरदृष्टी आहे. त्यामुळं अनेक नेते दाेन्ही नेत्यांना भेटत असतात. दाेन्ही नेते काेणत्या पक्षातील नेता आला आहे हे पाहत नाही तर ते त्यांनी आणलेले प्रश्न साेडवितात. त्यामुळं नेते मंडळी पवार साहेब आणि दादांची भेट घेत असतात असे शिंदेंनी नमूद केले.

उदयनराजेंची राष्ट्रवादीत घरवापसी ?

खासदार उदयनराजे भाेसले यांची भाजपात घुसमट हाेत आहे का ? ते राष्ट्रवादीत पुन्हा येणार आहेत का? या प्रश्नावर आमदार शशिकांत शिंदे म्हणाले उदयनराजेंची काेठे घुसमट हाेते याचा शाेध घेणं आवश्यक आहे. मला नाही वाटत त्यांची काेठे घुसमट हाेते असे म्हणत उदयनराजे जेथे जातात तेथे अन्य लाेकांना घुसमटवून टाकतात अशी टिप्पणी शिंदेंनी केली.

Edited By : Siddharth Latkar

udayanraje bhosale
FIH Pro League: टीम इंडियानं फ्रान्सचा केला दणदणीत पराभव; आज दक्षिण आफ्रिकेशी लढत
udayanraje bhosale
Amit Shah On Owaisi Attack: धाेका लक्षात घेता ओवेसींनी Z Security स्विकारावी : अमित शहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com