Nitesh Rane: जामीन देताना कोर्टाने घातल्या 'या' अटी; ४ तासापासून राणेंनी अन्न खालेलं नाही, आज हाेणार अँजिओग्राफी?

आज भाजप आमदार नितेश राणेंना दिलासा मिळाला आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSaam Tv
Published On

- विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : संताेष परब (santosh parab) हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांना आज जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राणेंना जामीन मंजूर झाला आहे. याबाबत नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई म्हणाले न्यायालयाने जामीन मंजूर करताना नितेश राणेंच्यावर काही अटी घातल्या आहेत. (conditions on nitesh rane by sindhudurg court)

Nitesh Rane
FIH Pro League: टीम इंडियानं फ्रान्सचा केला दणदणीत पराभव; आज दक्षिण आफ्रिकेशी लढत

देसाई म्हणाले न्यायालयाने नितेश राणे यांना कणकवली (kankavali) तालुक्यात येण्यास बंदी घातली आहे. सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यात कणकवली सोडून ते कुठेही येऊ शकतात. जोपर्यंत दोषारोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत ते कणकवलीत येऊ शकत नाहीत. याबराेबरच आठवड्यातून एकदा तपासासाठी त्यांना (nitesh rane) ओरस पोलीस स्टेशनला हजर राहावे लागेल असंही देसाई यांनी नमूद केले. (nitesh rane latest marathi news)

दरम्यान नितेश राणेंना जामीन मंजूर झाल्यानंतर काेल्हापूरात (kolhapur) राणे समर्थकांनी सीपीआर रुग्णालया बाहेर जल्लाेष केला. तसेच राणेंची बंधू निलेश यांनी सत्याचा विजय झाल्याची भावना माध्यमांसमाेर व्यक्त केली. तसेच आजचा दिवस आनंदाचा आहे असेही त्यांनी नमूद केले. यावेळी निलेश राणेंचे (nliesh rane) कार्यकर्ते भेटून अभिनंदन करीत हाेते.

नितेश राणे यांचा जामीन अर्ज मंजूर झाला असला तरी त्यांची तब्येत अद्याप सुधारलेली नाही. कोल्हापूरात त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात (सीपीआर) उपचार सुरु आहेत. आज सायंकाळी सहा वाजता राणेंच्यावर अँजिओग्राफी केली जाणार असल्याची माहिती सीपीआरच्या प्रशासनाने दिली. चार वैद्यकीय अधिका-यांच्या उपस्थित राणेंवर अँजिओग्राफी केली जाईल. दरम्यान राणे यांनी चार तासापासून कोणतही अन्न खालेलं नाही. जामीन मिळाल्यामुळे नितेश राणे अँजिओग्राफी करून घ्यायला तयार होणार की नाही याकडं कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Nitesh Rane
Nitesh Rane Bail Granted: संताेष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना जामीन मंजूर
Nitesh Rane
Sindhudurg : हे दादागिरी करताहेत! राणेंच्या जामीन अर्जावरील सुनावणीपुर्वी सरकारी वकील घरत यांचा गंभीर आराेप
Nitesh Rane
Bandatatya Karadkar: हाे! 'बंडातात्या सातारा शहर पाेलिस ठाण्यात आले हाेते, २०-२५ मिनीट चाैकशी झाली'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com