दिल्ली : केंद्रीय एजन्सींच्या धोक्याच्या मूल्यांकनावर आधारित केंद्र सरकारने असदुद्दीन ओवेसींना (Asaduddin Owaisi) सुरक्षा देण्याचे आदेश दिले हाेते. परंतु त्यांच्या अनिच्छेमुळे दिल्ली पोलीस आणि तेलंगणा पोलीस त्यांना सुरक्षा पुरवू शकले नाहीत. त्यांना असलेला धोका पाहता त्यांना दिल्लीत बुलेटप्रूफ कारसह झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडून ते स्वीकारण्यास नकार देण्यात आला आहे. मी त्यांना केंद्र सरकारने दिलेली सुरक्षा स्वीकारण्याचे आवाहन करतो असे देशाचे गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी नमूद केलं. राज्यसभेत अमित शाह (Amit Shah) यांनी आज ओवेसींवर झालेल्या हल्लाबाबतचे निवेदन सादर केले. (Amit Shah On Owaisi Attack Marathi News)
अमित शहा म्हणाले हापूर जिल्ह्यातील घटना ३ फेब्रुवारीस घडली. तेथील अधिकाऱ्यांना असदुद्दीन ओवेसींच्या (MP Asaduddin Owaisi) त्या भागातल्या दाै-याबाबत कोणतीही पूर्व कल्पना नव्हती. त्यांच्या दाै-यांद्दल कोणतीही माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाला दिली गेली नव्हती. ओवेसींचा ताफा संध्याकाळी ५.२० च्या सुमारास हापूर जिल्ह्यातील पिलखुवाजवळील छिजारसी टोल प्लाझा ओलांडत असताना ही घटना घडली. त्यावेळी ओवेसी मेरठ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन दिल्लीला (delhi) परतत होते. यूपी पोलिसांनी तातडीने कारवाई करुन दोन आरोपींना अटक केली आणि दोन अनधिकृत पिस्तूल आणि एक चार चाकी जप्त केली आहे. (Owaisi Attack Latest Marathi News)
शहा म्हणाले, फॉरेन्सिक टीम वाहनाच्या तपशीलवार तपासणी करत आहेत. ज्याच्या खालच्या भागावर तीन गोळ्यांच्या खुणा होत्या आणि घटना घडली त्या ठिकाणाची. ते पुढे म्हणाले आयपीसी कलम 307 आणि फौजदारी कायदा दुरुस्ती कायद्याच्या कलम 7 अंतर्गत दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे तपास सुरू आहे. (Amit Shah Latest Marathi News)
यापूर्वी केंद्रीय एजन्सींच्या धोक्याच्या मूल्यांकनावर आधारित केंद्राने ओवेसींना सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश जारी केले होते. मात्र त्यांच्या अनिच्छेमुळे दिल्ली पोलीस आणि तेलंगणा पोलीस त्यांना सुरक्षा पुरवू शकले नाहीत. त्यांना असलेल्या धोक्याचे मूल्यांकन केले गेले आणि त्याच्या आधारे त्यांना दिल्लीत बुलेटप्रूफ कारसह झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यांनी (ताेंडी स्वरुपात) स्वीकारण्यास नकार दिला आहे. मी त्यांना केंद्राने दिलेली सुरक्षा स्वीकारण्याचे आवाहन करतो असे शाह (Amit Shah Latest News) यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.