Opposition Meeting: मोठी बातमी! शरद पवार विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत; अचानक कार्यक्रम केले रद्द

Sharad Pawar Cancel Opposition Meeting: विरोधकांच्या बैठकीला बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
 Sharad Pawar Action Plan Ready
Sharad Pawar Action Plan ReadySaam TV
Published On: 

Mumbai News: मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी दंड थोपाटले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. पाटण्यानंतर आता कर्नाटकातील बंगळुरू येथे काँग्रेसने बैठक बोलावली आहे. या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे . (Latest Marathi News)

काँग्रेसने बंगळुरूमध्ये बोलावलेल्या बैठकीत देशभरातील २४ पक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचा कार्यक्रमही निश्चित झाला आहे. या बैठकीत विरोधकांकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

 Sharad Pawar Action Plan Ready
Supreme Court Hearing: ठाकरे गटाचे मशाल चिन्ह जाणार की राहणार? सुप्रीम कोर्टात आज महत्वपूर्ण सुनावणी

विरोधी पक्षांनी मागच्या वेळी पाटण्यात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राहूल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासहित देशभरातील प्रमुख राजकीय उपस्थित होते. पाटण्यानंतर काँग्रेसने बंगळुरू येथे सभेचे आयोजन केले आहे. मात्र, आज शरद पवार हे बंगळुरु येथे होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला जाणार नाहीत. पवारांनी अचानक कार्यक्रम रद्द केला आहे .तर शरद पवार आज मुंबईत थांबणार आहेत.

दरम्यान, विरोधकांच्या बैठकीचा भाग असलेल्या बंगळुरूतील डिनरला देखील शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. तर ममता बॅनर्जी देखील डिनरला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शरद पवार आज मुंबईत आपल्या आमदारांची भेट घेणार आहे.

 Sharad Pawar Action Plan Ready
Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळात मोठा बदल, CM शिंदेंकडे असलेली खाती इतर मंत्र्यांकडे; कारण काय?

अजित पवारांनीही बोलावली सर्व आमदारांची बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत. सकाळी ९ वाजता मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात अजित पवार गटाची बैठक पार पडणार आहे. बैठकीनंतर सगळे आमदार एकत्र विधान भवनाकडे जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com