Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळात मोठा बदल, CM शिंदेंकडे असलेली खाती इतर मंत्र्यांकडे; कारण काय?

Maharashtra Assembly Monsoon Session 2023: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.
Maharashtra Assembly Monsoon Session 2023
Maharashtra Assembly Monsoon Session 2023Saam Tv
Published On

Maharashtra Assembly Monsoon Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून म्हणजेच सोमवारपासून (१७ जुलै) सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, युती सरकारचा विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला. यादरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session 2023
Maharashtra Assembly Monsoon Session: अधिवेशनात ‘फ्लोअर मॅनेजमेंट’चे आव्हान! खातेवाटप आणि खातेबदल झाल्याने अनेक मंत्र्यांना करावा लागणार होमवर्क

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडील असलेली खाती इतर मंत्र्यांकडे तात्पुरती वर्ग करण्यात आली आहे. ही सर्व खाती शिंदे गटाच्या आमदारांनाच देण्यात आली आहे. सभागृहामध्ये या खात्यांसंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जातील त्याची उत्तरे या मंत्र्यांकडून दिली जाणार आहेत.

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा (Cabinet Expansion) तिसरा विस्तार पार पडेल, असं सांगितलं जात होतं. मंत्रिपदासाठी भाजप तसेच शिंदे गटातील आमदार उत्सुक होते. मात्र, अजित पवार यांची सरकारमध्ये एन्ट्री झाली. पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.

त्यानंतर या मंत्र्यांच्या खातेवाटपावरून युती सरकारमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. परिणामी खातेवाटप झालं, पण मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. आता पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session 2023
Shinde-Fadnavis-Pawar Govt PC : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, पावसाची चिंता आम्हालाही आहे; CM एकनाथ शिंदेंची ग्वाही

कोणाकडे कोणते खातं?

दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Monsoon Session) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली काही खाती तात्पुरती इतर मंत्र्यांना देण्यात आली. त्यात गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भूसे यांना परिवहन, अब्दुल सत्तारांकडे खनिकर्म आणि दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण खातं देण्यात आलं आहे.

अधिवेशनाचा पहिला दिवस कोण गाजवणार?

दरम्यान, यंदाचं पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधक एकवटले असून राज्य सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे काँग्रेसचा विरोधी पक्षनेता सोमवारीच जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहेत. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार काँग्रेसमधील ही नाव चर्चेत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com