Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Anand Paranjpe join shivsena shinde group: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी पक्षांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला.
Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
sunetra pawar Saam TV Marathi
Published On
  • सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

  • आनंद परांजपेंनी सोडली पक्षाची साथ

  • आनंद परांजपे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश

  • श्रीकांत शिंदे, दादा भुसे आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद परांजपे यांनी पक्षाची साथ सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. १४ वर्षांनंतर आनंद परांजपे यांनी घरवापसी केली. मंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले. आज दुपारीच आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनाम दिला होता. त्यानंतर त्यांनी शिंदेसेनेत पक्षप्रवेश केला. आमदारकी न मिळाल्यामुळे ते नाराज होते त्यामुळेच त्यांनी पक्षाची साथ सोडत शिंदेगटात प्रवेश केला असल्याचे सांगितले जात आहे.

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश समन्वय ठाणे आणि पालघर जिल्हा अशा सर्वच पदांचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी दुपारी राजीनामा सोपवला. त्यानंतर आज रात्री त्यांनी शिवसेना शिंदेगटामध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे ठाण्यामध्ये शिंदेसेनेची ताकद आणखी वाढली आहे. हा सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Maharashtra politics : शिंदेंकडून धक्कातंत्राचा वापर, दिग्गज नेत्याला दिली आमदारकीची ऑफर, विधान परिषद निवडणुकीत ट्वीस्ट

आनंद परांजपे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले होते की, 'मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा १४ वर्षांचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे.'

Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Elections: मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा धुरळा उडणार, विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक

आनंद पराजंपे यांनी पक्ष प्रवेशानंतर सांगितले की, 'शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मला खासदार होता आलं. पोटनिवडणूकित शिंदेसाहेबांनी माझी जबाबदारी घेतली होती. कोणत्याही पदाच्या लालसेने मी पक्षात आलो नाही. शिवसेनेचे आत्मा हे संघटन आहे. संघटनेत जी जबाबदारी दोघे देतील ती मी पार पाडेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील मी आभार मानतो. मी राष्ट्रवादीमध्ये असताना देखील म्हणत होतो की माझ्या डीएनएमध्ये शिवसेना आहे. माझी कोणतीही नाराजी नाही. कोणतीही नाराजी ठेवून पक्ष प्रवेश करत नाही. मी कोणतंही शल्य मनात ठेवून मी प्रवेश करत नाही.'

गेल्या काही दिवसांपूर्वीच आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री यांची नंदनवन येथे घेतली होती. या भेटीनंतर आनंद परांजपे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. आज अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आनंद परांजपे यांच्यावर शिवसेना पक्षात संघटनेची मोठी जबाबदारी आणि महामंडळ उपाध्यक्ष पद दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com