Navi Mumbai Crime: “पोलीस ठाण्यात गेलास तर मर्डर”; खारघरमध्ये तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Migrant Youth Assault: नवी मुंबईतील खारघर येथे एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलीय. मारहाणीनंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.
Migrant Youth Assault:
KHARGHAR YOUTH ASSAULT: VIRAL VIDEO SHOWS BRUTAL BEATING WITH DEATH THREATsaam tv
Published On
Summary
  • खारघरमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण

  • मारहाणीदरम्यान जीवे मारण्याची धमकी

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी मुबंईतील खारघर परिसरात एका परप्रांतीय तरुणाला काही अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मारहाण करताना “पोलीस ठाण्यात गेलास तर तुझा मर्डर करू” अशी उघड धमकीही मारहाण करणारे होते. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Migrant Youth Assault:
Crime News: धक्कादायक! आईचा खून करून तरुणाने स्वतःला खोलीत बंद केलं; मृतदेहाजवळ लागला खेळू

मारहाण करणाऱ्यांपैकी एकाचे नाव दत्तू असं आहे. तो तरुणाला मारहाण करताना जीवे मारहण्याची धमकी देत दिल्याचेही व्हिडीओमध्ये ऐकू येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही घटना खारघरमधील एका सेक्टरमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. काही तरुणांनी संबंधित तरुणाला रस्त्याच्या कडेला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Migrant Youth Assault:
Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

आजूबाजूला उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. मात्र, कोणीही तत्काळ हस्तक्षेप न केल्याचेही दिसून येते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त करत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेत. दरम्यान पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली होत आहे. या संदर्भात नवी मुंबई पोलीस यांच्या खारघर पोलीस ठाणे येथे संपर्क साधला असता, संबंधित व्हिडिओची चौकशी करून कारवाई केली जाईल असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com