Crime News: धक्कादायक! आईचा खून करून तरुणाने स्वतःला खोलीत बंद केलं; मृतदेहाजवळ लागला खेळू

Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमध्ये एका तरुणाने आपल्या आईची हत्या करून स्वतःला खोलीत कोंडून घेतल्याची घटना घडली. हिंसक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागला.
Ahilyanagar Crime :
Crime Shock in Maharashtra: Youth Kills Mother, Confines Himself Indoorssaamtv
Published On

अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील नवले नगर परिसरात एका तरुणाने आपल्या आईची हत्या करून स्वत:ला खोलीत बंद करून घेतलं. त्यानंतर आईच्या मृतदेहाजवळ बसून तो गोट्या खेळू लागला. सुहास गवारे असे या तरुणाचे नाव असल्याचं सांगितलं जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, हा तरुण मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गेल्या एक तासांपासून विकृत तरुणाला बाहेर काढण्यासाठी पोलीस कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मात्र तरुण हाताला त्यांच्यावर वस्तू फेकून मारत होता. शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय.

Ahilyanagar Crime :
Shocking : मुलाच्या डोक्यात सैतान शिरला, जन्मदात्या बापाचा जीव घेतला; हैवानी कृत्यामागचं कारण उघड

नवले नगर परिसरात एका विकृत तरुणाने तीक्ष हत्याराने आपल्या आईचा खून केला आणि स्वतःला खोलीत डांबून घेतले होते. आईचा खून केल्यानंतर तो आईच्या मृतदेहाजवळ बसून गोट्या खेळत बसला होता. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल होऊन गेल्या एक तासांपासून या विकृत तरुणाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. पण तरुण पोलिसांनावर हल्ला करत होता. अखेर पोलिसांनी त्याच्या डोळ्यावर मिरचीचे पाणी फेकलं. त्यामुळे त्याला दिसेनासे झाले. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून विकृत तरुणाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com