Shocking : मुलाच्या डोक्यात सैतान शिरला, जन्मदात्या बापाचा जीव घेतला; हैवानी कृत्यामागचं कारण उघड

Jalgaon Crime News : जळगावमध्ये रिक्षा विकत घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या वादातून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
Shocking : मुलाच्या डोक्यात सैतान शिरला, जन्मदात्या बापाचा जीव घेतला; हैवानी कृत्यामागचं कारण उघड
Jalgaon Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • जळगावमध्ये पैशांच्या वादातून मुलाने वडिलांची हत्या केली

  • पत्नीच्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा अटकेत

  • चाळीसगाव शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू

  • घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे

जळगावमध्ये वडील मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. रिक्षा घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून मुलाने जन्मदात्या पित्याची हत्या केली आहे. सदर घटना जळगावच्या चाळीसगाव शहरातील एम.जी. नगर येथे घडली. भिकन रणा मोरे (वय ६८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेननंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिकन मोरे हे पत्नी सखुबाई व मुलगा कल्पेश यांच्यासह चाळीसगाव शहरातील एम.जी. नगर येथे राहत होते. कल्पेश हा काही दिवसांपासून वडिलांकडे रिक्षा घेण्यासाठी पैशांची मागणी करत होता. मात्र कल्पेशला वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. शनिवारी सायंकाळी याच कारणावरून घरात टोकाचा वाद झाला.

Shocking : मुलाच्या डोक्यात सैतान शिरला, जन्मदात्या बापाचा जीव घेतला; हैवानी कृत्यामागचं कारण उघड
Ajit Pawar Accident Video : अजित पवारांच्या विमान अपघाताचा अंगावर काटा आणणारा नवीन व्हिडिओ समोर, पाहा Video

वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संतापाच्या भरात कल्पेशने काठी व कमरेच्या पट्ट्याने भिकन मोरे यांना मारहाण केली. या मारहाणीत भिकन मोरे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले.

Shocking : मुलाच्या डोक्यात सैतान शिरला, जन्मदात्या बापाचा जीव घेतला; हैवानी कृत्यामागचं कारण उघड
Crime News : लुटेरी दुल्हन! मुलगी दाखवून रितसर लग्न अन् मग टोळीनं शेतकऱ्याला लुबाडले, यवतमाळमध्ये नेमकं चाललंय काय?

घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी कल्पेश मोरे याला अटक केली. पत्नी सखुबाई मोरे यांच्या फिर्यादीवरून मुलाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com