Crime News
A shocking twist in Datia murder case as police reveal the victim’s wife as the mastermind behind the planned killingSaam tv

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

MP Crime News : दहा दिवसापुर्वी मध्य प्रदेशातील सिंध नदीच्या पुलाखाली एक मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी लावला असून आरोपी पत्नीला अटक केली आहे.
Published on
Summary
  • दातियामध्ये सिंध नदीच्या पुलाखाली मृतदेह आढळला

  • पोस्टमॉर्टममध्ये गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट

  • पत्नीच निघाली सुनियोजित हत्येची सूत्रधार

मध्य प्रदेशातील दातिया येथील गोराघाट पोलीस स्टेशन परिसरात सिंध नदीच्या पुलाखाली झुडुपात एका अज्ञात तरुणाच्या मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी १० दिवसांत केला. या हत्येचा उलगडा झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सुनियोजित कट रचत खून करण्यात आला होता. विशेष म्हणजे या हत्याकांडाची सूत्रधार मृतकाची पत्नीच निघाली.

खरंतर ६ फेब्रुवारी रोजी गोराघाट पोलिस स्टेशन परिसरात महामार्गावरील सिंध नदीच्या पुलाखाली झुडुपात एका ३५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांनी सुरुवातीपासूनच हत्येचा संशय घेतला. पोस्ट मॉर्टमच्या रिपोर्टमध्ये हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. या व्यक्तीचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला होता.

Crime News
Bhiwandi Crime: उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देतो म्हणून लॉजवर नेलं; सेना कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

पण दोन दिवसांनंतर जेव्हा मृताचे कुटुंब त्याला शोधत दातिया येथे पोहोचले तेव्हा त्याची ओळख पटली. हाती आलेल्या माहितीनुसार, मृतक व्यक्ती झाशी येथील रहिवासी हंसराज वर्मा याचा होता. मृताची ओळख पटताच, पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचे जबाब, कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने एका संबंधापर्यंत पोहोचले ज्यामुळे या हत्येचे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

तपासात असे दिसून आले की मृत हंसराजची पत्नी बबिता वर्मा आणि त्याच्या काकाचा मुलगा हेमंत आर्य हे बऱ्याच काळापासून फोनवरून संवाद साधत होते. हे संभाषण हळूहळू प्रेमसंबंधात रूपांतरित झाले. हंसराज जुन्या तेलाचा व्यापार करायचा. त्याच्या पत्नीच्या फोनपे अकाउंटद्वारे पैसे ट्रान्सफर केले जात होते. यामुळे बबिता आणि हेमंत यांच्यात बोलणं सुरू झालं. जे नंतर प्रेमात रुपांतरीत झालं.

Crime News
पुण्यातील संतापजनक घटना! लॉजवर न्यायचं होतं, पण डोंगरवर नेलं; देहविक्री करणाऱ्या महिलेसोबत ६ जणांचं भयंकर कृत्य

घटनेच्या दिवशी हंसराज ग्वाल्हेरला निघून गेला होता. त्याच दिवशी बबिताने तिचा प्रियकर हेमंतला फोन करून त्यांची माहिती दिली. , "नवरा ग्वाल्हेरला जाण्यासाठी घरातून निघला आहे तो परत यायला नको, ती तुझी जबाबदारी आहे." येथूनच हत्येचा कट आखण्यात आला. त्यानंतर हेमंतने त्याचा मित्र अनिल खटिकला या कटात सहभागी करून घेतले. ते दोघेही हंसराजला भेटायला गेले.

त्याचा खून करण्याआधी हेमंत आणि अनिल यांनी हंसराजला दारू पाजली. तो दारूच्या नशेत असताना त्यांनी त्याला त्यांच्या दुचाकीवरून झाशी येथे सोडून असं सांगितलं. आरोपींनी त्याला डाबरा आणि गोराघाट पुलांजवळ वाटेत पुन्हा दारू पाजली. गोराघाट पोलिस स्टेशन हद्दीत पूल ओलांडताना तिघे जण रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांजवळ थांबले. आरोपींनी मफलरने हंसराजचा गळा दाबत त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह झुडपात फेकून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com