Breakup : बॉयफ्रेंडनं ब्रेकअप केलं, बोलणं सोडलं; संतापलेल्या तरूणीने धावत्या लोकलमधून मारली उडी

Vashi Creek bridge incident : नवी मुंबईत प्रेमभंगामुळे एका तरुणीने वाशी खाडीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक मच्छिमारांच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले. या घटनेचा वाशी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Mumbai Local Train Update:
Mumbai local 15 coach trains will run on tracks. saam tv
Published On

प्रेमात आलेले अपयश आणि प्रियकराने अचानक संपर्क तोडल्याने नवी मुंबईतील एका तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉयफ्रेंडने बोलणं सोडल्यामुळे मानसिक धक्क्यात गेलेल्या मुलीने लोकल वाशी खाडीच्या पुलावर आल्यानंतर (Vashi Creek Bridge) उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) केला. मात्र सुदैवाने जवळच असलेल्या स्थानिक मच्छिमारांच्या सतर्कतेमुळे या तरुणीचे प्राण वाचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध (Love Affair) होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. याच वादातून प्रियकराने तिचा फोन नंबर ब्लॉक (Phone number blocked) केला होता. वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होत नसल्याने ही तरुणी नैराश्यात होती. याच रागातून आणि दुखातून तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि वाशी खाडीत उडी घेतली.

Mumbai Local Train Update:
सॉफ्टवेअर इंजिनिअर हार्दिकने बहिणीवर ४० वार केले, आईलाही सोडले नाही; हत्येमागचं डोकं सुन्न करणारं कारण समोर...

तरुणीने खाडीत उडी मारताच तिथे मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छिमारांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या बोटी त्या दिशेने वळवल्या. खाडीच्या पाण्यात बुडत असलेल्या तरुणीला मच्छिमारांनी बाहेर काढले. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai Local Train Update:
युद्धाचा मुंबईला मोठा फटका; गॅस तुटवड्यामुळे २०% हॉटेल्स बंद, आकडा ५० टक्क्यांवर जाण्याची भीती

या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी (Vashi Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली असून घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. प्रियकराने नक्की कोणत्या कारणावरून नंबर ब्लॉक केला आणि यामागे आणखी काही कारणे आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Mumbai Local Train Update:
T20 World Cup final : वर्ल्डकप फायनलवेळी राडा, भारताची विकेट पडल्यामुळे वाद, १७ वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या

टीप - कोणतीही अडचण आली, अथवा त्रास झाला तर आत्महत्या करणे हा पर्याय नाही. आयुष्य संपवण्याचा विचार कऱण्याआधी कुटुंबियांचा विचार करावा. मदतीसाठी सरकारी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com