सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई|ता. २३ जानेवारी २०२४
मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात उतरलेले मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह राजधानी मुंबईकडे निघाले आहेत. २६ जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली निघालेले मराठा बांधवांचे वादळ दोन दिवसात मुंबईमध्ये धडकणार आहे. २५ जानेवारीला जरांगे पाटील हजारो मराठा बांधवांसह मुंबईमध्ये प्रवेश करतील. मराठा आंदोलनामुळे मुंबईमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचदृष्टीने २५ तारखेला नवी मुंबईतील (Navi Mumbai) कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार असल्याची माहिती समितीचे सचिव पी. एल. खंडागळे यांनी दिली आहे
२५ तारखेला बाजार समितीतील पाचही बाजारपेठा राहणार बंद राहणार आहेत. एपीएमसी मार्केट बंद ठेऊन मराठा आंदोलकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच २५ तारखेला मराठा आंदोलकांसाठी तर 26 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी असल्याने मार्केट बंद राहणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आज पुण्यात मुक्काम!
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवालीमधून निघालेल्या मराठा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. काल रांजणगावमध्ये असलेला हा मोर्चा आज (२३, जानेवारी) पुण्यात (Pune) मुक्कामी असेल. पुण्यात खराडी बायपास चंदननगर येथे जरांगे पाटील आज मुक्कामी असतील, त्यानंतर परवा मोर्चा पुढे लोणावळ्याकडे रवाना होईल. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.