Mumbai University Exam: परीक्षा विभागाचा गोंधळात गोंधळ; विद्यार्थ्यांच्या हातात दिला भलताच पेपर, राज्यभरात खळबळ

Mumbai University Exam News: मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागाचा गोंधळ संपण्याचं नाव घेत नाही आहे. विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षांचे पेपरफुटीचं प्रकरण ताजं असतानाच परीक्षा विभागाचा आणखी एक नवा गोंधळ समोर आला आहे.
Mumbai University Exam
Mumbai University ExamSaam Digital
Published On

संजय गडदे

Mumbai University Exam

मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागाचा गोंधळ संपण्याचं नाव घेत नाही आहे. विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षांचे पेपरफुटीचं प्रकरण ताजं असतानाच परीक्षा विभागाचा आणखी एक नवा गोंधळ समोर आला आहे. मुंबई विद्यापीठ दूरस्थ शिक्षण (IDOL) विभागातर्फे आज होऊ घातलेल्या प्रथम वर्ष/सत्र पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रम (MMS) परीक्षेला फायनान्शियल मॅनेजमेंट ऐवजी फायनान्शिअल अकाउंट विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला.

विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर आजचा पेपर रद्द करण्यात आला आहे. आज रद्द करण्यात आलेला पेपर फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याबाबत विद्यार्थ्यांना कळविण्यात आले आहे. मात्र दूरस्थ शिक्षण विभाग येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी आपला नोकरीधंदा करुन शिक्षण घेत असतात त्यांना सुट्टया मिळणे कठीण असते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होण्यासोबतच त्यांना प्रचंड मानसिक तणावाला देखील सामोरे जावे लागत आहे.

मुंबई विद्यापीठ दूरस्थ शिक्षण (IDOL) विभागातर्फे प्रथम वर्ष/सत्र पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रम (MMS) परीक्षेला आज पासून सुरुवात झाली आहे. दुरुस्त शिक्षण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या एमएमएस या अभ्यासक्रमासाठी साधारणपणे दीडशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांपैकी अनेक जण नोकरी किंवा काम धंदा करून परीक्षेची तयारी करत आहेत. आज पासून सुरू झालेल्या या परीक्षेमध्ये मुंबई विद्यापीठ दुरुस्त शिक्षण विभागाच्या परीक्षा विभागाने मोठा गोंधळ घातला आहे. विद्यार्थ्यांचा आज फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयाचा पेपर होता मात्र विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना फायनान्शिअल अकाउंट विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हातात पेपर पडतात प्रश्नपत्रिका वाचून विद्यार्थ्यांना मोठा धक्काच बसला यासंदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या प्रमुखांना ही बाब लक्षात आणून दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुळात नियमानुसार ज्या विषयाचा पेपर असतो त्याचे तीन प्रश्नसंच तयार ठेवणे अपेक्षित असताना आज विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून अशी कोणतीच सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली नाही. प्रश्नपत्रिकाच्या हेडलाईनमध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट असे लिहिले मात्र आज देण्यात आलेले प्रश्न हे संपूर्णपणे फायनान्शिअल अकाउंट विषयाचे असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला परिणामी आजची परीक्षा विद्यापीठाकडून रद्द करण्यात आली आहे.

Mumbai University Exam
Mumbai Local Train: लोकल ट्रेनच्या धडकेत 3 रेल्वे कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू; वसई-नायगाव परिसरातील घटना

मात्र परीक्षा रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे अनेक विद्यार्थी हे काम धंदा व नोकरी करून शिकत आहेत असे असताना विद्यार्थ्यांना पर्यायी दुसरा पेपर देणे अपेक्षित असताना विद्यापीठाकडून आजचा होणारा पेपर फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घेतला जाईल असे विद्यार्थ्यांना कळविण्यात आले यानंतर ही बाब विद्यार्थ्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या माजी सिनेट सदस्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर सिनेट सदस्य हे आता आक्रमक झाले असून त्यांनी याला जबाबदार असणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Mumbai University Exam
Balasaheb Thackeray Jayanti 2024: बाळासाहेब ठाकरे असंख्य लोकांच्या हृदयात...PM मोदी ते शरद पवारांसह दिग्गजांकडून अभिवादन!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com