Mumbai Police
Mumbai PoliceSaam TV

Mumbai Police: मुंबई पोलीस ऑन ड्युटी २४ तास; २८ जानेवारीपर्यंत सर्व सुट्ट्या रद्द

Police Leave Cancelled: मुंबईसह राज्यात कोणताही अनुचीत प्रकार घडूनये यासाठी पोलीस प्रशासना सज्ज आहे. राम मंदिरामुळे अयोध्येसह मुंबईतील नागरिकांनी देखील मोठ्या जल्लोषात उत्सवाची तयारी केली आहे.
Published on

Mumbai:

मुंबई पोलीसांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. विविध कार्यक्रमांमुळे २८ जानेवारीपर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचार्ऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्यात. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी २८ तारखेपर्यंत फक्त वैद्यकी सुट्टी घेऊ शकतात. गृह खात्याकडून पोलीस महासंचालनालयाला हे निर्देश देण्यात आले आहेत.

Mumbai Police
Mumbai Marathon: मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या दोन स्पर्धकांचा मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर...

सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडतोय. त्यामुळे राज्यात विविध धार्मिक स्थळांवर नागरिकांची गर्दी असणार आहे. मुंबईसह राज्यात कोणताही अनुचीत प्रकार घडूनये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. राम मंदिरामुळे अयोध्येसह मुंबईतील नागरिकांनी देखील मोठ्या जल्लोषात उत्सवाची तयारी केली आहे. अनेक शहरे दिवाळी असल्याप्रमाणे सजवली गेलीत.

राम मंदिर सोहळा पार पडल्यावर मुंबईत मराठा आरक्षणाच्या मगणीसाठी मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणारेत. मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल होण्यासाठी मनोज जरांगे पाटील आपल्या मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईत २७ जानेवारीपर्यंत ते पोहचणार आहेत. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी केलं जाणारं आंदोलन शांततेत पार पडणं गरजेचं आहे.

मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडूनये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा लागणार आहे. त्यामुळे देखील २८ जानेवारीपर्यंतच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात. पोलीस आयुक्तालये, गुप्तवार्ता विभाग, राज्य राखीव पोलीस दल, नक्षल विरोधी अभियान, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शनिवारी सकाळी ही नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये २० ते २८ जानेवारीपर्यंत कुणालाही सुट्टी घेता येणार नाही, असे कळविण्यात आले आहे.

Mumbai Police
Kangana Ranaut Video : अयोध्येमध्ये पोहचतात रामभक्तीत तल्लीन झाली कंगना रनौत, हनुमान गढी मंदिरात झाडू मारत केली स्वच्छता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com