Mumbai Marathon: मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या दोन स्पर्धकांचा मृत्यू; धक्कादायक कारण आलं समोर...

Mumbai Marathon News: मुंबई मॅरेथॉनमध्ये धावत असताना दोन व्यक्तींचा दुर्देवी मृत्यू झाला. राजेंद्र चंदमल बोरा (वय ७४) आणि सुव्रदीप (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत.
Mumbai Marathon Latest Marathi News
Mumbai Marathon Latest Marathi NewsSaam TV
Published On

Mumbai Marathon Latest Marathi News

आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित अशा मुंबई मॅरेथॉनची स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, स्पर्धेदरम्यान एक दुर्देवी घटना घडली. मॅरेथॉनमध्ये धावत असताना दोन व्यक्तींचा दुर्देवी मृत्यू झाला. राजेंद्र चंदमल बोरा (वय ७४) आणि सुव्रदीप (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Marathon Latest Marathi News
Mumbai Local Train: राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशीच मुंबईकरांची तारांबळ; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

राजेंद्र आणि सुव्रदीप या दोघांनीही मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला होता. मात्र, धावत असताना दोघेही अचानक खाली कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. (Latest Marathi News)

दरम्यान, हृदय विकाराच्या झटक्याने (Heart Attack) दोघांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. मात्र, अजूनही त्यांच्या मृत्युचे कारण समजू शकलेलं नाही. तर ४५ वर्षीय सुव्रदीप हे देखील धावत असताना कोसळले होते. त्यांना मृत घोषित करण्यात आलंय. त्यांच्या मृत्यूचं कारण समजू शकलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मुंबई मॅरेथॉनचे १९ वे वार्षिक आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. यात तब्बल ५९ हजार ५१५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या मॅरेथॉनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीएसटी येथे हिरवा झेंडा दाखवला.

मात्र, मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान २२ स्पर्धक दम लागून कोसळले. यात ७४ वर्षीय राजेंद्र चंदमल बोरा आणि कोलकाता येथील ४५ वर्षीय सुव्रदीप यांचा देखील समावेश होता. त्यांच्या मृत्युने हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक धावपटूंना मेडलच मिळाली नाही, असा आरोप करण्यात आला. यामुळे काही वेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Mumbai Marathon Latest Marathi News
Ram Mandir News: अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज विराजमान होणार रामलल्ला; संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com