Maratha Survey: शिक्षकांना ओव्हरटाइम करावा लागणार; राज्यात आजपासून मराठा सर्वेक्षणाला सुरूवात

Maratha Reservation: शिक्षण विभागातील सर्वाधिक ३ हजार ५०० कर्मचाऱ्यांना या कामाला जुंपण्यात येणार असल्यामुळे महापालिका व त्यांच्याशी संलग्न शाळांतील बहुतांश शिक्षक सर्वेक्षणाच्या कामावर जातील.
Maratha Survey
Maratha SurveySaam TV
Published On

रणजीत माजगावकर

Maratha Reservation News:

राज्यात आजपासून मराठा सर्वेक्षण केले जाणार आहे. मुंबईत महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे काम देण्यात आले आहे. यामुळे रुग्णालये व शैक्षणिक कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Maratha Survey
Maratha Reservation: मराठा आरक्षण पदयात्रा आज पुण्यात धडकणार; पोलिसांनी वाहतुकीचे मार्गच बदलले

२३ ते २५ जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण चालणार असून त्यानंतर सलग तीन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे सहा दिवस प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे.

शिक्षण विभागातील सर्वाधिक ३ हजार ५०० कर्मचाऱ्यांना या कामाला जुंपण्यात येणार असल्यामुळे महापालिका व त्यांच्याशी संलग्न शाळांतील बहुतांश शिक्षक सर्वेक्षणाच्या कामावर जातील. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची भीती आहे.

आजपासून सर्वेक्षण सुरू करण्याची जाहिरात राज्यभरातील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यभरातील शिक्षक, मुख्याध्यापकांकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचा सर्वे केला जाणार आहे. मात्र प्रत्यक्षात आज सकाळी सर्वेला सुरुवात झालेली नाही.

शिक्षकांना ओव्हरटाइम

सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी आणि सायंकाळी शाळा संपल्यानंतर शिक्षकांना सर्वे करावा लागणार आहे. तब्बल ४९ पानांमध्ये १५४ प्रश्नांची मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. सर्वे करण्यासाठी शिक्षकांवर अनेक अटी लादल्या आहेत.

काल सुट्टीच्या दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची एक दिवसांची कार्यशाळा घेतली गेली. कालावधी कमी असल्याने सर्वे पूर्ण करण्याचं शिक्षकांसमोर मोठं आव्हान उभं आहे.

Maratha Survey
Viral Video: एकमेकींचे केस ओढले, चापटी मारल्या; बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये भररस्त्यात हाणामारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com