Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ! कोट्यवधींचा मनी लॉन्डरिंग घोटाळा उघड , ईडीचे ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

Ashok Kharat Case Update News : स्वतःला देवाचा अवतार म्हणवणाऱ्या अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन भोंदू बाबा’विरोधात ईडीने 42.88 कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात 3 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
ED FILES 3000-PAGE CHARGESHEET AGAINST CAPTAIN BHONDU BABA IN ₹42.88 CRORE MONEY LAUNDERING CASE
ED FILES 3000-PAGE CHARGESHEET AGAINST CAPTAIN BHONDU BABA IN ₹42.88 CRORE MONEY LAUNDERING CASESaam Tv
Published On
Summary
  • ईडीने अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन भोंदू बाबाच्या अडचणीत वाढ

  • 42.88 कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात 3 हजार पानांचे आरोपपत्र दाखल

  • पत्नी कल्पना खरातसह एकूण सहा जण या प्रकरणात आरोपी

  • आरोपपत्रासोबत ३७ साक्षीदारांचे जबाब न्यायालयात सादर

संजय गडदे, मुंबई

स्वतः देवाचा अवतार असल्याचा दावा करून भाविकांची फसवणूक करणाऱ्या अशोक एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन भोंदू बाबा’च्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने त्याच्या विरोधात ४२.८८ कोटी रुपयांच्या कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयात तब्बल ३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरातसह आणखी चार जणांनाही आरोपी करण्यात आले आहे.

ईडीच्या तपासानुसार, अशोक खरातने अनेक वर्षे धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. ‘अवतार पूजा’ आणि विशेष धार्मिक विधींच्या माध्यमातून आजार, आर्थिक संकटे, कौटुंबिक समस्या तसेच भविष्यातील अडचणी दूर होतील, असे आश्वासन देऊन भक्तांकडून देणग्या आणि पूजा शुल्क घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेषतः व्यावसायिकांना आर्थिक नुकसान किंवा कुटुंबीयांच्या सुरक्षिततेबाबत भीती दाखवून मोठ्या रकमांची वसुली केल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.

ED FILES 3000-PAGE CHARGESHEET AGAINST CAPTAIN BHONDU BABA IN ₹42.88 CRORE MONEY LAUNDERING CASE
Snake Facts : सापांना कान नाहीत, मग ते आवाज कसे ऐकतात? ९९ टक्के लोकांना याबद्दल माहिती नाही

तपासादरम्यान काही धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत. दैवी शक्ती असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी रिमोट कंट्रोलद्वारे चालणारे बनावट साप, वाघाची कातडी यांसारख्या वस्तूंचा वापर करण्यात येत असल्याचे ईडीने म्हटले आहे. तसेच महिला भक्तांना संशयित गुंगीचे औषध देणे आणि चिंचेच्या बिया, दगड तसेच मध यांना चमत्कारिक उपचार असल्याचे सांगून त्यांची विक्री केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

ED FILES 3000-PAGE CHARGESHEET AGAINST CAPTAIN BHONDU BABA IN ₹42.88 CRORE MONEY LAUNDERING CASE
Skin Care : चेहऱ्यावर एकाच जागी वारंवार पिंपल येतोय? यामागे असू शकते 'हे' गंभीर कारण; वेळीच व्हा सावध

मनी लॉन्डरिंगसाठी विविध सहकारी पतसंस्था आणि बेनामी खात्यांचा वापर करण्यात आल्याचा ईडीचा दावा आहे. राहाता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेत 108 तर सिन्नर येथील जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत 34 बेनामी खाती उघडण्यात आल्याचे तपासात आढळल्याचे सांगितले आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करून ती रक्कम नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर आणि मुंबईतील मालमत्ता खरेदीसाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे.

ED FILES 3000-PAGE CHARGESHEET AGAINST CAPTAIN BHONDU BABA IN ₹42.88 CRORE MONEY LAUNDERING CASE
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा १८-२२ आणि २४ कॅरेटचे दर

ईडीने केलेल्या छाप्यांमध्ये 13.92 कोटी रुपयांची रोकड, 5.18 लाखांचे विदेशी चलन, 1.12 कोटी रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, 2.60 कोटी रुपयांच्या बँक ठेवी तसेच एक मर्सिडीज-बेंझ कार जप्त केली आहे. एकूण 17.70 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त किंवा गोठवण्यात आली असून, याशिवाय 19.20 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ताही तात्पुरत्या जप्त करण्यात आल्या आहेत. या आरोपपत्रासोबत ईडीने 37 साक्षीदारांचे जबाब, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि जप्तीशी संबंधित दस्तऐवज न्यायालयात सादर केले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून विशेष पीएमएलए न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com