Kanda Batata Market Vashi Closed : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आक्रमक, कांदा बटाटा मार्केट पाडलं बंद, मनपा मुख्यालयाकडे कूच

narendra patil closed kanda batata market vashi : मनापा आयुक्तांची भेट घेऊन मार्केटचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.
narendra patil closed kanda batata market vashi
narendra patil closed kanda batata market vashi Saam Digital

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई महानगरपालिकेने एपीएमसी कांदा बटाटा मार्केट आणि एपीएमसी प्रशासकीय इमारतीची जलवाहिनी बंद गुरुवारी बंदी केली. एपीएमसी कांदा बटाटा मार्केट आणि अन्य ठिकाणी पाणी येत नसल्याने माथाडी वर्ग आक्रमक झाला आहे. आज (साेमवार) माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट बंद करुन माेर्चा काढण्याचा पवित्रा घेतला.

एपीएमसी कांदा बटाटा मार्केटची इमारत अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने एपीएमसी कांदा बटाटा मार्केट आणि एपीएमसी प्रशासकीय इमारतीची जलवाहिनी बंद केली. जलवाहिनी बंद केल्याने मार्केटमधील व्यापारावर परिणाम हाेऊ लागल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.

narendra patil closed kanda batata market vashi
गल्लीच्या कोपऱ्यावर ड्रग्ज मिळू लागलेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव : सतेज पाटील

या बराेबरच एपीएमसी प्रशासकीय इमारतीचे पाणी देखील बंद झाल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. या निर्णया विराेधात आज माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील हे कांदा बटाटा मार्केट मध्ये आक्रमक झाल्याे पाहायला मिळाले. पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट बंद केले. सर्व माथाडी मापाडी यांच्यासह मनपा मुख्यालयावर मोर्चा काढण्यासाठी मार्केट मधील व्यापारी, कामगारांना आवाहन केले.

त्यानंतर सर्व माथाडी मापाडी आणि व्यापाऱ्यांसह नवी मुंबई मनपा मुख्यालयावर मोर्चा काढला. बाईक रिक्षा आणि खाजगी वाहनांमधून सर्व मोर्चेकरी मनपा मुख्यालयाकडे रवाना झाले.

Edited By : Siddharth Latkar

narendra patil closed kanda batata market vashi
Navi Mumbai MNS : आज प्रश्न सुटणारच? नवी मुंबई महापालिका कार्यालयासमाेर मनसेचा ठिय्या (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com