Nalasopara: आई-वडिलांची नजर चुकली, अन् चिमुकला स्विमिंग पूलमध्ये बुडाला; मन विचलित करणारा VIDEO

13 Month Old Toddler Drowns in Swimming Pool: स्विमिंग पूलमध्ये बुडून १३ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
Nalasopara: आई-वडिलांची नजर चुकली, अन् चिमुकला स्विमिंग पूलमध्ये बुडाला; मन विचलित करणारा VIDEO
13 Month Old Toddler Drowns in Swimming PoolSaam Tv
Published On
  • नालासोपाऱ्यात चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

  • खेळता खेळता चिमुकला स्विमिंग पूलमध्ये पडला

  • प्रसिद्ध फार्म हाऊसमधील दुर्दैवी घटना

  • सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली

मनोज तांबे, नालासोपारा

नालासोपाऱ्यातून एक मन सु्न्न करणारी घटना समोर आली आहे. स्विमिंग पूलमध्ये बुडून १३ महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या स्विमिंग पूलवर अनेक जण मजामस्ती करत होते पण कुणाचीच नजर त्याच्याकडे गेली नाही. बऱ्याच वेळानंतर काही तरुणांना या चिमुकल्याचा मृतदेह दिसला त्यानंतर ही धक्कादायक घटना उघड झाली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेकडील कळंब येथील एका प्रसिद्ध फार्म हाऊसमध्ये ही घटना घडली. १३ महिन्याचा चिमुरडा खेळता- खेळता स्विमिंग पूलमध्ये पडला आणि त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हा सर्व प्रकार फार्म हाऊसमध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. आयुष दशरथ ईभाड असे या मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nalasopara: आई-वडिलांची नजर चुकली, अन् चिमुकला स्विमिंग पूलमध्ये बुडाला; मन विचलित करणारा VIDEO
Shocking : धक्कादायक! पत्नीचे ३ वर्षांपासून अफेअर, पतीला कळताच बॉयफ्रेंडचा काढला काटा

मूळचे डहाणू तालुक्यातील कोसबाड (वरईपाडा) येथील रहिवासी असलेले दशरथ शिणवार ईभाड (३२ वर्षे) आणि त्याची पत्नी हे कळंब येथील 'तुलसी फार्म हाऊस'मध्ये मजुरीचे काम करतात. २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास फार्म हाऊसवर ग्राहकांची मोठी गर्दी होती. यावेळी दशरथ ईभाड हे ग्राहकांना सांभाळण्यात व्यस्त होते. तर त्यांची पत्नी अनुषा ही किचनमध्ये भांडी घासण्याचे काम करत होती.

Nalasopara: आई-वडिलांची नजर चुकली, अन् चिमुकला स्विमिंग पूलमध्ये बुडाला; मन विचलित करणारा VIDEO
Nashik: घरामध्ये लाईट बसवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून नवविवाहित तरुणाचा जागीच मृत्यू

त्याचवेळी आई-वडिलांची नजर चुकली आणि चिमुकला आयुष स्विमिंग पूलकडे गेला. इतर मुलं स्विमिंग पूलमध्ये खेळत असल्याचे पाहून या आयुष देखील स्विमिंग पूलमध्ये उतरला. यावेळी कुणाचीच नजर त्याच्याकडे गेली नाही. स्विमिंग पूल खोल असल्यामुळे आयुषचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही तरुणांना पोहताना आयुषचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ त्याला स्विमिंग पूलच्या बाहेर काढले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. त्याचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.

Nalasopara: आई-वडिलांची नजर चुकली, अन् चिमुकला स्विमिंग पूलमध्ये बुडाला; मन विचलित करणारा VIDEO
Shocking: खाताना कुरकुरेचा तुकडा श्वसननलिकेत अडकला, तरुणाचा तडफडून मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com