Shocking : धक्कादायक! पत्नीचे ३ वर्षांपासून अफेअर, पतीला कळताच बॉयफ्रेंडचा काढला काटा

Chhattisgarh Crime News : छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात पत्नीच्या कथित प्रियकराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
JASHPUR MURDER CASE: HUSBAND KILLS WIFE'S ALLEGED LOVER WITH STONE, THREE ARRESTED
JASHPUR MURDER CASE: HUSBAND KILLS WIFE'S ALLEGED LOVER WITH STONE, THREE ARRESTEDSaam Tv
Published On
Summary
  • प्रेमप्रकरणाच्या वादातून ३४ वर्षीय तरुणाची हत्या

  • विवाहित महिलेशी असलेल्या कथित संबंधांमुळे वाद भोवला

  • आरोपींनी मारहाण करून डोक्यावर दगड फेकत हत्या केली

छत्तीसगडमधील जशपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला आपल्या पत्नीच्या प्रेमप्रकरणाबद्दल समजताच वैतागून तिच्या बॉयफ्रेंडची दगडाने ठेचून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका अल्पवयीन मुलासह तीन आरोपींना अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेला दगडही जप्त केला आहे. तसेच पुढील तपास सुरु असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पाथळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमजुनवानी खरापारा गावात घडली. मृत तरुणाचे नाव सुशील खालखो (वय ३४) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशीलचे गावातील एका विवाहित महिलेशी दीर्घकाळापासून संबंध होते. संबंधित महिलेच्या पतीने अनेकदा त्यांना रंगे हात पकडले होते. या संबंधांना महिलेच्या पतीचा तीव्र विरोध होता. यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा वाद झाले होते. गावात सामाजिक पंचायीतीद्वारे हा वाद मिटवण्याचाही प्रयत्न झाला होता, मात्र त्यातून कोणताही तोडगा निघाला नव्हता.

JASHPUR MURDER CASE: HUSBAND KILLS WIFE'S ALLEGED LOVER WITH STONE, THREE ARRESTED
Shocking : धक्कादायक! महिला इंस्पेक्टरवर सासऱ्याकडून बलात्कार; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेली पण...

काही वर्षांपूर्वीही याच कारणावरून महिलेच्या पतीने सुशीलविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणात कारवाई होऊन सुशीलला तुरुंगवासही झाला होता. सुमारे दीड महिन्यापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. मात्र, सुटकेनंतरही संबंधित महिला आणि सुशील यांच्यात संपर्क कायम असल्याचा आरोप आहे. गुरुवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सुशील आपल्या घराच्या अंगणात बसला असताना आरोपी जयलाल एक्का, जयमन एक्का आणि एक अल्पवयीन मुलगा तेथे पोचले. त्यांनी आधी सुशीलला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर मोठा दगड फेकून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सुशीलचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले होते.

JASHPUR MURDER CASE: HUSBAND KILLS WIFE'S ALLEGED LOVER WITH STONE, THREE ARRESTED
Maharashtra Monsoon : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, मराठवाड्यावर सर्वात मोठं सकंट; हवामान विभागाच्या अंदाजाने धाकधूक वाढली

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एफएसएल पथक घटनास्थळी दाखल झाले. पुरावे गोळा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी जयलाल एक्का (३४), जयमन एक्का (३६) आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक केली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com