Zeeshan Siddique: मविआ सरकारच्या काळात माझ्यावर अन्याय झाला, झिशान सिद्दीकी स्पष्टच बोलले

Zeeshan Siddique on Congress : काँग्रेसचे युवा आमदार झिशान सिद्दिकी यांनी साम टीव्हशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसबाबत महत्वाचं विधान केलं. त्याचबरोबर त्यांनी ठाकरे गटाच्या युवा नेत्यावरही निशाणा साधला.
Zeeshan Siddique: मविआ सरकारच्या काळात माझ्यावर अन्याय झाला, झिशान सिद्दीकी स्पष्टच बोलले
Zeeshan Siddique Saam Tv
Published On

काँग्रेसचे युवा आमदार झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेस पक्षाचे हायकमांड आणि उबाठावर जोरदार हल्ला केलाय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना माझ्यावर अन्याय झाल्याचा आरोप आमदार सिद्दिकी यांनी केलाय. त्याच्या आरोपामुळे महाविकास आघाडीमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आलीय.

वरुण सरदेसाई आणि काँग्रेस नेत्यांमधील भेटीगाठींबद्दल बोलताना काँग्रेसचे वांद्रे पूर्व मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी यांनी यांनी संताप व्यक्त केलाय. झिशान सिद्दकीने उबाठावर डागली तोफ डागलीय. त्याचबरोबर त्यांनी पक्षाच्या हायकमांडबाबत नाराजी व्यक्त केली. उबाठाने माझा फंड अडवून धरला म्हणून मी विकासकामे करू शकलो नाही. माझ्यावर अन्याय होत होता पण हायकमांड मला गप्प राहायला सांगायचे, असा संताप सिद्दीकी यांनी व्यक्त केलाय.

ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटीबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करून आपण थकलो. तरीही आज झालेल्या वरुण सरदेसाई आणि काँग्रेस नेत्यांमधील या भेटीची तक्रारही आपण करणार आहोत. तूर्तास त्यांनी अशा एसी हॉटेल्समध्ये सभा घेत राहावे. पण आम्ही उन्हातान्हात जनतेच्या पाठीशी उभे राहू. ते बोलत राहतील. आम्ही चर्चा करत राहू. आपण काम करत राहू आणि लोकांची मने जिंकत राहू, असं झिशान सिद्दिकी म्हणाले.

वांद्रे पूर्व मतदारसंघावर वाद

आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस महाविकास आघाडीमार्फत लढणार आहे. मात्र जागा वाटपावरून मविआमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व विधानसभा ठाकरे गटाला मिळाली पाहिजे, असा दावा ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. यावर काँग्रेसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांनी नाराज आहेत.

वांद्रे पूर्व विधानसभेत काँग्रेसचा एक विद्यमान आमदार असला तरी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाते अशी चर्चा सुरू झालीय. जर वांद्रे पूर्वची ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली तर हा काँग्रेस कार्यकर्त्यांचा पराभव असेल. शिवसेना ठाकरे गट म्हणेल आम्हीही तेच करणार, तर तसं कसं चालेल? माझ्याविरुद्ध अनेक वर्षांपासून षडयंत्र रचलं जात आहे. काँग्रेसचे काही नेतेही मला बाजूला करण्यात धन्यता मानत आहेत, असं सिद्दीकी म्हणाले.

काँग्रेसचे प्रवक्ते आणि वरिष्ठ नेत्यांनी बाहेर येऊन ही जागा आमची आहे आणि आम्हीच लढू, असं सांगावं, असं झिशान सिद्दीकी म्हणाले. दरम्यान काँग्रेसने आपल्याला उमेदवारी दिली नाही तरी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा निश्चयही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

काय म्हणाले झिशान सिद्दीकी

असं होत असेल तर ही कार्यकर्त्याची हार आहे. पक्षाच्या बैठकीला दुसरा कोणता नेता येतो तर ते चुकीचं आहे.

मी काँग्रेसचा सिटिंग आमदार आहे तर उबाठाने विचार पण नाही केला पाहिजे की त्यांनी त्यांचा उमेदवार द्यावा.

आणि काँग्रेसने ही हिंमत ठेवावी की आमचा तिकडे उमेदवार आहे.त्यांनी सांगाव की ही आमची जागा आहे.

पण मित्र पक्षाला खुश करण्यासाठी काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांना संपवत चालली आहे आणि हे दुर्भाग्य पूर्ण आहे.

मी काँग्रेसचा आमदार मी नक्कीच निवडणूक लढवणार. काँग्रेसला भूमिका मांडावी लागेल.

वरुणला विचारावं की तो बैठकीला का आला? तो उबाठामध्ये खुश नाही का? का तो काँग्रेस मध्ये येतोय. शिवसेना व काँग्रेसची युती ही अनसैर्गिक. आज आहे उद्या नसेल

इतर नेत्यांना पक्षाच्या बैठकीला बोलवतात हे चुकीचं आहे. मला बोलवलं नाही जनता सर्व बघत आहे. कार्यकर्ता हायकमांडला विचारणार आहे.

मला जरी उमेदवारी नाही मिळाली तरी मी निवडणूक लढवणार. काँग्रेसने नाही दिली तरी मी निवडणूक लढवणार. जनता माझ्यासोबत आहे.

कोणत्या पक्षासोबत जाऊन लढायचं ही मी जनतेत जाऊन ठरवणार आहे.

२०१९ ला मी उबाठाच्या उमेदवाराला हरवलं होत. तेव्हा जनता माझ्या सोबत होती. ठाकरे गटाने कोणताही विकास केला नाही. मी विकासकाम केली. ऊबाठाचे काही नेते पूर्ण वेळ बिल्डरसोबत असतात.

मी मविआचा विरोध असा केला की माझ्या मतदार संघातच उबाठाने माझ्यावर अन्याय केला.

माझ्या मतदारसंघात उद्घाटन असायचे पण मला बोलवले नाही जायचे. मविआच्या आमदाराला जो फंड मिळायला पाहिजे होता तो फंड मला मिळायचा नाही.

मी सर्व गोष्टींची तक्रार हायकमांडे करायचो पण काही उत्तर नाही मिळायचं

नाना पटोले म्हणतात की मविआ म्हणून ते पुढे जाणार आहेत तर मग जा पण तुमच्या आमदारांसाठी पण लढा ना. तुमच्या सारखे नेते आमच्यासाठी नाही लढले तर मग आम्ही कुठे जाणार?

मी अनेक वेळा माझ्यावर जो अन्याय झाला त्याची तक्रार हायकमांडकडे करायचो. अनिल परब माझ्यावर अन्याय करायचे पण मला दिल्लीतून फोन यायचा की तु गप्प बस तुझ्यामुळे मविआ मध्ये फूट पडेल.

Zeeshan Siddique: मविआ सरकारच्या काळात माझ्यावर अन्याय झाला, झिशान सिद्दीकी स्पष्टच बोलले
Baba Siddique Resign : लोकसभा निवडणुकांआधीच काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का, बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com