Baba Siddique Resign : लोकसभा निवडणुकांआधीच काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का, बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा

Baba Siddique Resign From Congress : मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Baba Siddique Resign
Baba Siddique Resign SAAM TV
Published On

Baba Siddique Resign, Mumbai Politics :

लोकसभा निवडणुकांआधीच काँग्रेसला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. मिलिंद देवरांनंतर आता ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सिद्दीकी यांनी स्वतः एक्सवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.  (Latest Marathi News)

मिलिंद देवरा यांनी काँग्रेससोबतच्या राजकीय (Maharashtra Politics) प्रवासाला 'विराम' दिल्यानंतर मुंबईतील आणखी एक बडा नेता काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा होती. बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याचवेळी बाबा सिद्दीकी यांनी या वृत्ताचं खंडन केलं होतं.

मी आजही काँग्रेससोबत आहे आणि भविष्याचं काही सांगता येणार नाही, असं ठणकावून सांगितलं होतं. मात्र, त्याच्या काही दिवसांनंतरच बाबा सिद्दीकी यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असं जाहीर केलं आहे.

काय म्हणाले बाबा सिद्दीकी?

मी तरूणपणातच काँग्रेसशी जोडलो गेलो होतो. मागील ४८ वर्षांचा प्रवास माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. आज तात्काळ प्रभावाने मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खूप काही बोलायचं होतं, पण काही गोष्टी न बोललेल्याच उत्तम असतात. माझ्या प्रवासात ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे मी आभार मानतो, अशी पोस्ट बाबा सिद्दीकी यांनी एक्सवर लिहिली आहे.

Baba Siddique Resign
Rohit Pawar News: राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर त्यांचे स्वागतच: आमदार रोहित पवार

बाबा सिद्दीकीचं पुढचं पाऊल काय असेल?

बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचा राजीनामा देऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. सिद्दीकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. तसं त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जाहीरही केलं. मात्र, पुढील राजकीय वाटचालीबाबत काही स्पष्ट केलं नाही. काँग्रेससोबतचा प्रवास आणि या प्रवासात साथ मिळालेल्यांचे त्यांनी आभार मानले. मात्र, मला बरंच काही बोलायचं होतं, पण न बोललेलेच बरे असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Baba Siddique Resign
Pune Politics : मनसेच्या वसंत मोरेंच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमुळं पुण्यातलं राजकारण ढवळलं, कुणासाठी काहीही करा, पण...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com