बिहार सरकारचे भवितव्य आज ठरणार, तेजस्वी यादव यांनी आमदारांसाठी व्हीप केला जारी

आज २४ ऑगस्टपासून विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे.
Bihar Political News
Bihar Political NewsSaam Tv
Published On

नवी दिल्ली: बिहारमध्ये (Bihar) मागिल काही दिवसापासून राजकीय उलथापालत सुरू आहे. नितीश कुमार यांनी भाजपसोबत युती तोडत राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले आहे. आजचा दिवस या सरकारसाठी महत्वाचा आहे. आज २४ ऑगस्टपासून विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू होत आहे. यादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. त्यामुळे आजचा दिवस या सरकारसाठी महत्वाचा आहे.

दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदावरुन दोन्हीकडून रस्सीखेच सुरू आहे. सभापती विजय सिन्हा आपले पद सोडतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पदाचा राजीनामा न दिल्यास सत्ताधारी पक्ष त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणू शकतो. या सगळ्या दरम्यान उपमुख्यमंत्री आणि आरजेडी विधीमंडळ पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या सर्व आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. सर्व आमदारांना सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Bihar Political News)

Bihar Political News
कच्चे तेल पुन्हा महागले, पेट्रोल, डिझेल महागणार? पाहा नवे दर

बिहार (Bihar) विधानसभेत एकुण २४३ सदस्य आहेत, पण सध्या सभागृहात २४१ सदस्य आहेत. विधानसभेत २ सदस्य कमी आहेत. असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष AIMIM च्या एकमेव आमदाराने विश्वासदर्शक ठरावादरम्यान महाआघाडी सरकारच्या बाजूने मतदान करणार असल्याचे बोलले जात आहे. सभागृहात एकूण १६५ आमदार महाआघाडीच्या बाजूने असतील. या अगोदर महाआघाडीत सहभागी सर्व पक्षांच्या आमदारांसह एक अपक्ष असे एकूण १६४ आमदार होते. अपक्ष सुमितकुमार सिंह यांनी सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. बिहार विधानसभेतील आमदारांची सध्याची संख्या पाहता बहुमतासाठी १२१ आमदारांची गरज आहे.

Bihar Political News
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडी विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे. आरजेडीचे ७९ आमदार आहेत, तर मित्रपक्ष जेडीयूचे ४५ आमदार आहेत. तर काँग्रेसकडे १९, डाव्या पक्षांचे १६, जीतन राम मांझी यांचा पक्ष एचएएमकडे ४ आणि एआयएमआयएमकडे १ आमदार आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकारला जादूई आकडा गाठण्यात फारशी अडचण येणार नाही. (Bihar Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com