'गेट आऊट! 'नारी शक्ती'च्या मोर्च्यात नारीच भडकली, भाजपच्या आंदोलनात महिला का चिडली?

Woman Slams BJP Minister In Rally : नारी शक्ती वंदन विधेयक पडल्यानं भाजपनं मोर्चा काढला. मात्र हा मोर्चा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. एक महिला भाजपच्या मोर्चावर चांगलीच भडकलीय. त्याचं नेमकं कारण काय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Woman Slams BJP Minister In  Rally :
Angry Mumbai woman confronts BJP leaders amid traffic chaos during protest rally.saam tv
Published On

मुंबईकर महिलेचा हा संताप आहे मुंबईतील भाजपच्या मोर्चातला. त्याचं झालं असं की, लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्यानं विरोधी पक्षाचा निषेध करण्यासाठी भाजपनं मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढला. हा मोर्चा सुरू झाला तो जांबोरी मैदानापासून. मात्र या मोर्चामुळे ट्राफिक जॅम झालं. आणि मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघालेली महिला ट्राफिकमध्ये एक तास अडकून पडल्यानं तिच्या संतापाचा भडका उडाला. आंदोलन मैदानात जाऊन करा असं म्हणत संतापलेली ही महिला थेट मोर्चात घुसुन पोलिसांना आणि मंत्री गिरीश महाजनांना भिडली.

Woman Slams BJP Minister In  Rally :
राज्यात भाजपची मोठी रणनीती; युवकांना जोडण्यासाठी आखला मास्टरप्लान

या घटनेमुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय. महिला आरक्षणावर भाजप खोटेपणानं वागत असल्याच यातून समोर आल्याचा टोला काँग्रेससह मनसे आणि ठाकरेसेनेनं मारला. दुसरीकडे स्थानिक नागरिकांनीही या महिलेप्रमाणेच भाजपच्या मोर्चाबद्दल संताप व्यक्त केलाय.

Woman Slams BJP Minister In  Rally :
शेतकरी कर्जमाफी परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर; काय असणार कर्जमाफीचे नियम आणि अटी?

गिरीश महाजनांनी महिलेच्या संतापावर प्रतिक्रिया दिलीय. महिलेनं संताप व्यक्त करताना बॉटल फेकल्याचा आणि महिलेची भाषा योग्य नसल्याचं महाजनांनी म्हटलंय.तर मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी मात्र महिलेला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितलीय. खरं तर मोर्चा काढणं हा संविधानिक अधिकार आहे. मात्र त्याचा सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, याची खबरदारी घ्यायला हवी. पोलिसांनीही ट्राफिकचं योग्य नियोजन करायला हवं.नाहीतर विधायक मोर्चा, आंदोलनालाही आता नागरिक विरोध करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com