

भाजपच्या युवा मोर्चाने युवकांना जोडण्यासाठी मोठा प्लान आखला आहे. भाजपने तरुणांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाशी जोडण्यासाठी ‘युवाशक्ती जागर मोर्चा’ची घोषणा केली आहे. या दौऱ्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला. या शुभारंभाच्या कार्यक्रमावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मोर्चाची दिशा स्पष्ट केली. राज्यातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाशी जोडण्याची आणि त्यांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देण्यासाठी मोहीम व्यापक करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व्यासपीठावरील युवा मनाचे आणि उर्जावान नेतृत्व असल्याचे नमूद केलं. यानंतर रविंद्र चव्हाण यांनी यात्रेचा उद्देश स्पष्ट केला. चव्हाण म्हणाले, 'भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबवण्यात येणारा पहिला उपक्रम आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तरुणांसाठी लोककल्याणकारी निर्णय यात्रेच्या माध्यमातून कानाकोपऱ्यात पोहोचवले जातील. पंतप्रधान मोदींना अपेक्षित सक्षम युवाशक्तीचे संघटना उभारणे हेच मुख्य ध्येय आहे'.
'राज्यातील युवकांना विकास, नवकल्पना आणि राष्ट्रहिताच्या विचारांशी जोडणार असल्याचे भाजपच्या महाडिक यांनी स्पष्ट केले. या यात्रेतून महाराष्ट्रातील विविध भागात जाणार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले. तर यात्रेमुळे युवकांमध्ये जागर निर्माण होईल. त्यामुळे सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकीची जाणीव करून देईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मंत्री मंत्री जयकुमार गोरे, मंत्री अतुल सावे, मंत्री नितेश राणे, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच भाजयुमो प्रदेश प्रभारी सुनील राणे, मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.