Mumbai Crime News: धक्कादायक! वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन दुचाकीस्वाराला रोखलं, त्याने थेट अंगावरच गाडी चढवली, कर्मचारी गंभीर जखमी

Mumbai Crime News: मुंबईच्या वाकोला परिसरात एका दुचाकीस्वाराने कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime Newssaam tv
Published On: 

संजय गडदे

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. मुंबईच्या वाकोला परिसरात एका दुचाकीस्वाराने कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Marathi News)

मुंबईत वाकोला वाहतूक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई विमानतळाच्या आठ नंबर गेट समोरील वाकोला मिलिटरी कॅम्प परिसरातील रस्त्यावर ही घटना घडली. यात वाहतूक कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल विजय चव्हाण (४८) हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना जवळील वी एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Mumbai Crime News
Dhule Crime News: महिलेवर मेहुण्याचा चाकूहल्ला; भीतीतून गळफास घेत आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मुंबई विमानतळाच्या आठ नंबर गेट भागात व्हीआयपी मुव्हमेंट असल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. याच परिसरात क्रिकेट सामने खेळण्यासाठी दुचाकीवरून ट्रिपलसीट प्रवास करत असलेल्या दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा वाहतूक पोलीस विजय चव्हाण यांच्याकडून करण्यात आला.

मात्र, चव्हाण यांनाच धडक देऊन दुचाकीस्वाराने पळ काढला. मात्र, पळून जाताना दुचाकीचा धक्का लागून चव्हाण रस्त्यावर कोसळले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सांताक्रुज पूर्वेकडील पालिकेच्या वी एन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Mumbai Crime News
Lucknow Crime News: चालकाने ई-रिक्षातून शव थेट रस्त्यावर फेकलं...काळीज पिळवटून टाकणारी घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

दरम्यान, चव्हाण यांनी यासंदर्भात वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुचाकी चालवणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र दुचाकी चालवणारा मुलगा अल्पवयीन असल्यामुळे वाकोला पोलिसांनी मुलाच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.