Dhule Crime News
Dhule Crime NewsSaam tv

Dhule Crime News: महिलेवर मेहुण्याचा चाकूहल्ला; भीतीतून गळफास घेत आत्महत्या

महिलेवर मेहुण्याचा चाकूहल्ला; भीतीतून गळफास घेत आत्महत्या
Published on

धुळे : धुळे शहरातील कुमारनगरात सोमवारी (२२ मे) दुपारी महिलेवर मेहुण्याने चाकूहल्ला केला. त्यात महिलेला जबर (Dhule News) दुखापत झाली. नंतर तिचा मृत्यू झाला असावा; या भीतीतून मेहुण्याने घरी जात गळफास घेऊन आत्महत्या केली. जखमी महिलेला (Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Maharashtra News)

Dhule Crime News
Beed News: दारूच्या नशेसाठी बनला मोबाईल चोर; पोलिसांनी १७ मोबाईलसह घेतले ताब्यात

हरीश आसिजा असे मृत मेहुण्याचे नाव समोर येत आहे. घटनेमागचे नेमके कारणाचा पोलिस शोध घेत आहेत. संबंधित महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावरील हल्ल्यानंतर मेहुणा पसार झाला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. शहराचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मेहुण्याचा शोध सुरू केला.

Dhule Crime News
Nandurbar News: सूर्यफूल पिकाची लागवड वाढली; भाव नसल्‍याने शेतकरी अडचणीत

पोलिस घरी पोहचले अन्‌

पोलिस शोध घेत त्‍याच्‍या घरी पोहचले. यावेळी तो त्याच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. चाकूहल्ला केल्यानंतर ती महिला मृत झाली असावी, या भीतीने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com